प्रेमात अडथळा ठरलेल्या बापाचा लेकीनंच काढला काटा, मायलेकीला अटक

इचलकरंजीतील खून प्रकरण; पत्नीसह मुलीला पोलिस कोठडी, हत्यारे जप्त
crime wife and daughter killed father Shantinath Ketkale kolhapur update
crime wife and daughter killed father Shantinath Ketkale kolhapur updatesakal

इचलकरंजी : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानेच शांतिनाथ केटकाळे यांची पत्नी आणि मुलगीने मिळून खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सुजाता शांतिनाथ केटकाळे (वय ३६) आणि साक्षी शांतिनाथ केटकाळे (वय २१) यांना अटक करून आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघींना २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कबनूर येथील गांधी विकासनगरातील शांतिनाथ केटकाळे यांचा मंगळवारी (ता. २२) रात्रीच्या सुमारास निर्घृण खून झाला होता. लोखंडी कटावणी व बॅट तसेच चाकूने वार करत खून करून त्यांची पत्नी सुजाता आणि मोठी मुलगी साक्षी शिवाजीनगर पोलिसांत स्वत:हून हजर झाल्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र जखमी केटकाळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी सुजाता व साक्षी यांचीही कसून चौकशी केली.

शांतिनाथ केटकाळे यांची पत्नी सुजाता यांचे तसेच मुलगी साक्षीचे बाहेर प्रेमसंबंध होते. यावरून घरात वारंवार वाद होई. अशातच सोमवारी साक्षीला स्थळाची पाहणी झाली होती. मंगळवारी दिवसभर वादच सुरू होता. यातून रात्री चिडून दोघींनी बॅट, चाकू, लोखंडी कटावणीने शांतिनाथ यांच्यावर राहत्या घरात हल्ला केला. त्यांच्या डोक्यात वर्मी घाव बसून त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद महावीर कल्लाप्पा केटकाळे यांनी दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत. केटकाळे यांच्या आणखी दोन अल्पवयीन मुलींना नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. आज दोघींना येथील न्यायालयात हजर केले असता २८ फेब्रुवारीपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अन्य संशयिताचा शोध

साक्षी व सुजाताचे बाहेर प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून हा खून झाला असला तरी आणखी कोणते कारण आहे का याचाही शोध सुरू आहे. खुनानंतर चोरीछुपे पत्नी आणि मुलगी घराबाहेर पडल्या. काही काळाने पोलिस ठाण्यात पोहोचल्या. या कालावधीतील घडामोडींची शक्यता पाहता खुनाचा खोलवर तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com