Kolhapur : चित्रपटगृहांतील गर्दी वाढू लागली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

theater

चित्रपटगृहांतील गर्दी वाढू लागली!

कोल्हापूर : लॉकडाउननंतर आता चित्रपटगृहे सुरू झाली असून, शहरातील पाच चित्रपटगृहांमध्ये विविध चित्रपटांच्या खेळांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ‘पीव्हीआर'', ‘आयनॉक्स''नंतर अप्सरा, पद्मा, ऊर्मिला, शाहू आणि प्रभात ही चित्रपटगृहे सुरू झाली आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करूनच प्रेक्षकांना प्रवेश दिला जात असून, हळूहळू प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांमध्ये येतील, अशी अपेक्षा आहे.

शासनाने चित्रपटगृहे खुली करण्यास परवानगी दिली. पण, ५० टक्के आसनक्षमता आणि इतर कोरोना नियमांबरोबरच प्रदर्शित होण्यासाठी चित्रपटच उपलब्ध नसल्याने चित्रपटगृह मालकांनी चित्रपटगृहे बंद ठेवण्यालाच पसंती दिली. दिवाळीपूर्वी ती अधिक क्षमतेने सुरू होतील, अशी अपेक्षा होती. पण, तरीही चित्रपट उपलब्ध नसल्याने फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सुरवातीला केवळ दोनच चित्रपटगृहे शहरात सुरू झाली आणि आता पाच चित्रपटगृहे सुरू झाली असून, हळूहळू येथे प्रेक्षकांची गर्दी वाढू लागली आहे.

loading image
go to top