शिक्षक मतदार संघातून दादासाहेब लाड यांचा उमेदवारी अर्ज  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dadasaheb Lads candidature application from Shikshak constituency

दादासाहेब लाड हे हातकणगले येथील रामराव इंगवले हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक पदावरती कार्यरत होते

शिक्षक मतदार संघातून दादासाहेब लाड यांचा उमेदवारी अर्ज 

कोल्हापूर : शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, टप्पा अनुदानित शाळाना पूर्ण अनुदान मिळावे असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठीच पुणे शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवित असल्याची भूमिका दादासाहेब लाड यांनी व्यक्त केली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या उपस्थित त्यांनी आपला उमेदवारी अर्ज पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल केला. 

दादासाहेब लाड हे हातकणगले येथील रामराव इंगवले हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक पदावरती कार्यरत होते, वीस वर्ष कोल्हापूर जिल्हा माजी शिक्षक पतसंस्थेत कार्यरत होते. यावेळी, कोजिमाशिसे पतसंस्थेचे चेअरमन कैलास सुतार, उपाध्यक्ष सुभाष पाटील ,संचालक बाळ डेळेकर, राजेन्द्र रानमाळे, एच. आर. पाटील, संजय डवर, शांताराम तोंदकर, गंगाराम हजारे, अरविद किल्लेदार, अनिल चव्हाण, जनार्दन गुरव कोजिमाशि पतपेढी संचालक आर. एस. पाटील, मनोहर पाटील, मुख्याध्यापक संघाचे संचालक प्रकाश पोवार, मदन निकम, अशोक मानकर, मच्छिंद्रनाथ शिरगांवकर, मा प्रल्हाद पताडे ,सचिन पाटील, दिपक कांबळे, संजय व्हनागडे, काका भोकरे, पी. आर. कोकाटे, एम के पवार, श्रीकांत दळवी, मोहन पाटील दिलीप तळेकर भगवान पाटील , नामदेव गुंजु वते , रवि घाटगे , दिलीप पाटील , अरविंद मस्त्री, जी आर पाटील , गिरीगोसावी सर व असंख्य शिक्षक उपस्थित होते. 

हे पण वाचाही पदवीधरची निवडणूक आहे, आता माघार नाही ; डॉ. श्रीमंत कोकाटे

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top