पन्हाळा : दत्त-आसुर्ले कारखान्याची निवडणूक बिनविरोधच्या मार्गावर

‘केडीसीसी’ बॅंकेच्या १०६ कोटी रुपये कर्जासाठी या कारखान्याची २०१२ ते दालमिया ग्रुपला विक्री झाली होती
पन्हाळा : दत्त-आसुर्ले कारखान्याची निवडणूक बिनविरोधच्या मार्गावर
पन्हाळा : दत्त-आसुर्ले कारखान्याची निवडणूक बिनविरोधच्या मार्गावर

पन्हाळा : आसुर्ले पोर्ले येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. काल (ता. २०) या कारखान्याच्या २१ जागांसाठी २१ अर्ज दाखल झाले असून, आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी यांनी दिली.

‘केडीसीसी’ बॅंकेच्या १०६ कोटी रुपये कर्जासाठी या कारखान्याची २०१२ ते दालमिया ग्रुपला विक्री झाली होती. परंतु, काही तांत्रिक मुद्यांचा आधार घेत संस्थापक अध्यक्ष गणपतराव सरनोबत आणि संचालक मंडळाने कारखान्याचे पुनरुज्जीवन केले आणि निवडणूक लावली.

पन्हाळा : दत्त-आसुर्ले कारखान्याची निवडणूक बिनविरोधच्या मार्गावर
महिलांनो सज्ज व्हा! NDA ची परीक्षा यावर्षीच होणार - SC

काल सरनोबत गटाने करवीर, पोर्ले तर्फ ठाणे, यवलूज, कोतोली, बाजारभोगाव आणि पन्हाळा, गगनबावडा गटातून मंजूर जागेएवढेच तसेच उत्पादक गट, महिला, अनुसूचित जाती, इतर मागास, भटक्या विमुक्तमधून आवश्यक अर्ज दाखल केले. या अर्जांची छाननी उद्या (ता. २२) होणार असून, विरोधी गटाकडून अर्ज नसल्याने कुणाचीच तक्रार नसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com