दिलासादायक; कोल्हापुरात 40 दिवसानंतर मृत्यु 30 पेक्षा कमी

२३ एप्रिल ते ३ जून १८५३ जणांचा मृत्यू; जिल्ह्याची परिस्थिती
दिलासादायक; कोल्हापुरात 40 दिवसानंतर मृत्यु 30 पेक्षा कमी

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या चाळीस दिवसांत कोरोनामुळे (covid-19) रोज ३० पेक्षा जास्त होणाऱ्या मृत्युत आज घट झाली असून आज कोरोनामुळे २८ जणांचा मृत्यु (dead patients) झाला. तब्बल ४० दिवसांनी कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्यांची संख्या घटल्याने जिल्ह्याला दिलासा (kolhapur distrcit) मिळाला असला तरी बाधितांची संख्या मात्र वाढतच आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाचा कहर झाला होता. दुसऱ्या लाटेत मे महिन्यातच जिल्ह्यात उच्चांकी ४४ हजार १७१ रूग्ण आढळून आले आहेत तर याच महिन्यात कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. तर मे महिन्यांतच कोरोनामुळे मृत्यु झालेल्या रूग्णांची संख्या १४४९ वर पोहचली आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे जिल्ह्यात ३८२१ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला, यापैकी ३७ टक्के रूग्णांचा मृत्यु मे महिन्यात झाला आहे.

दिलासादायक; कोल्हापुरात 40 दिवसानंतर मृत्यु 30 पेक्षा कमी
दुर्घटना टळली; अरुंद रस्त्यावरून ट्रक घसरला, राधानगरी मार्गावरील घटना

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत मे महिना हा कोरोनाचा कहर आणणारा ठरला. या महिन्यात दिवसाला कमीत कमी ३४ तर जास्तीत जास्त ६२ रूग्णांचा मृत्यु झाला. सरासरी दिवसाला ४६ रूग्ण मे महिन्यातच कोरोनामुळे मृत्यु झाले आहेत. यातही सर्वाधिक ६२ रूग्णांचा मृत्यु १५ मे रोजी झाल्याची नोंद आहे तर सर्वात कमी ३४ रूग्णांचा मृत्यु २ मे रोजी झाला आहे. आता चाळीस दिवसानंतर आज पहिल्यांदा जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या २८ पर्यंत खाली आली आहे. २३ एप्रिल ते ३ जून या ४० दिवसांत जिल्ह्यात कोरोनामुळे १८५३ जणांचा बळी गेला आहे.

गेल्या ४० दिवसांतील मृत्यु

  • २३ एप्रिल - २६

  • २४ एप्रिल - ३१

  • २५ एप्रिल - ४१

  • २६ एप्रिल - ३५

  • २७ एप्रिल - ३२

  • २८ एप्रिल - ४०

  • २९ एप्रिल - ३९

  • ३० एप्रिल - ३७

  • १ मे - ३९

  • २ मे - ३४

  • ३ मे - ३५

  • ४ मे - ४४

  • ५ मे - ५३

  • ६ मे - ५४

  • ७ मे - ६०

  • ८ मे - ४६

  • ९ मे - ५०

  • १० मे - ६१

  • ११ मे - ५१

  • १२ मे - ५८

  • १३ मे - ५३

  • १४ मे - ४७

  • १५ मे - ६२

  • १६ मे - ५२

  • १७ मे - ५०

  • १८ मे - ३५

  • १९ मे - ४९

  • २० मे - ४४

  • २१ मे - ३८

  • २२ मे - ३४

  • २३ मे - ४६

  • २४ मे - ४१

  • २५ मे - ५७

  • २६ मे - ४५

  • २७ मे - ४६

  • २८ मे - ५६

  • २९ मे - ४०

  • ३० मे - ३७

  • ३१ मे - ४०

  • १ जून - ४५

  • २ जून - ३६

  • ३ जून २८

दिलासादायक; कोल्हापुरात 40 दिवसानंतर मृत्यु 30 पेक्षा कमी
चहाची तलप महागात! विलगिकरणातील पॉझिटिव्ह चहासाठी एकाच्या घरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com