साखरविरहित गुळालाच परदेशात मागणी

यंदा नव्या हंगामात साखरविरहित कोल्हापुरी गूळ द्यावा, अशी मागणी परदेशातील बाजारपेठांनी येथील निर्यातदारांकडे केली
jaggery
jaggery sakal

कोल्हापूर : कोल्हापुरी गुळाच्या नावावर परदेशी बाजारात अन्य जिल्हे व राज्यातील गूळ खपवला गेला. त्यामुळे कोल्हापुरी गुळाच्या लौकिलाला बाधा पोचत आहे. परिणामी, यंदा नव्या हंगामात साखरविरहित कोल्हापुरी गूळ द्यावा, अशी मागणी परदेशातील बाजारपेठांनी येथील निर्यातदारांकडे केली आहे. त्यामुळे साखरविरहित गूळ उत्पादन वाढविण्यास उत्पादकांना प्राधान्य द्यावे लागेल. त्यातूनच गुळाला चांगला भाव मिळून उलाढाल व नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

विशिष्ठ भौगोलिक वातावरणात तयार झालेल्या कोल्हापुरी गुळाचा गोडवा गुणवत्तापूर्ण मानला जातो. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशात कोल्हापुरी गुळाची सर्वाधिक मागणी असते.

दहा वर्षांत अपुरे मनुष्यबळ, साखरमिश्रीत गूळ, बाजारपेठेत जेमतेम भाव आदी कारणांनी गूळ उद्योग धोक्यात आला. अशात कर्नाटक सीमा भाग तसेच मराठवाड्यातही गुऱ्हाळ घरांची संख्या वाढली. त्यामुळे तेथेही गूळ उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते. तिथे गुळाची गुणवत्ताही कोल्हापुरी गुळापेक्षा कमी आहे. मात्र, मुबलक प्रमाणात व स्वस्त दरात तो गूळ विकला जातो. असा गूळ परदेशी बाजारपेठेतही पाठविला गेला, तर काही वेळा कोल्हापुरी भागातील गूळ अशा पळवाटेचे नाव देऊन परदेशात पाठविला गेला.

jaggery
‘लखीमपूर’च्या निषेधार्थ आज महाराष्ट्र ‘बंद’

थंड हवा असलेल्या देशात यातील काही गूळरवे कठीण होणे किंवा गुळात साखरेची पावडर निघणे अशा तक्रारी आल्या आहेत. कोल्हापूरी भागातील गूळ म्हणजे कोल्हापूरी गूळ असाच समज तिकडे झाला आहे. यामुळे कोल्हापुरी गुळाच्या लौकिकाला बाधा पोचली आहे.

यंदा पावसाळ्यापासूनच परदेशी विक्रेत्यांनी कोल्हापूरी गुळाची मागणी केली आहे. मात्र, साखरविरहित गूळ द्यावा, असा आग्रहही धरला आहे. दोन वर्षांत कोल्हापुरातील अनेक गुऱ्हाळ घरातील गुळातही साखर आढळली होती. त्यामुळे मागणी कमी झाली. उलाढाल कमी होऊन सर्वच घटकांचे नुकसान होते, ही बाब विचारात घेऊन परदेशासाठीच नव्हे, तर इतर राज्यांतही गूळ पाठविण्यासाठी साखरविरहित गूळच बनवणे आवश्यक आहे. अशा गुळाला चांगला भाव देण्याची तयारीही निर्यातदार दर्शवीत आहे.

दृष्टिक्षेपात...

  • एकूण गूळ उत्पादनातील २ ते ४ टक्के गूळ परदेशात जातो

  • दुबई, बहरीन, कुवेत, लंडन, अमेरिकेत मागणी

  • शुद्ध कोल्हापुरी गूळ टिकाऊ व गोडवा चांगला

"परदेशातून यंदा गुळाला मागणी चांगली आहे. लंडन, अमेरिकेसह आखाती देशात गूळ दरवर्षी जातो. यंदा मात्र साखरविरहित गुळाची मागणी होत आहे, हेही खरे आहे. गूळ पाठविल्यावर तो परदेशात खराब निघाला तर पुढच्या वेळी मागणी येत नाही. तिथे नुकसान होऊ शकते. त्यामुळे साखरविरहित गुळाच्या निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे."

- नीमेश वेद, गूळ व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com