'मोदींना वाघच म्हटलं पाहिजे, कारण...' - धनंजय महाडिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित होते

'मोदींना वाघच म्हटलं पाहिजे, कारण...' - महाडिक

कोल्हापूर - कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना पुढं पुढं करायची सवय आहे. पण एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात पुढाकार घेताना दिसत नाहीत, असा टोला भाजपाचे धनंजय महाडिक यांनी नाव न घेता लगावला आहे. आज ते कोल्हापुर येथे बोलत होते. येथे मध्यवर्ती बस स्थानकात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला त्यांनी भाजपाचा पाठिंबा असल्याचे घोषित करत त्यांनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधाला.

हेही वाचा: कॉंग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीबाबत खलबतं

ते म्हणाले, आताच एक आंदोलन करून आलो आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. राज्याने यावरील कर कमी केलेला नाही मात्र मोदी सरकारने हा कर कमी केलाय. डिझेल दरवाढ झाली म्हणून काँग्रेसने मोदी सरकारविरोधात आंदोलन केलं. यांचे काही पदाधिकारी घोड्यावरून गेले, मोदींचा विरोध केला. आता मोदींना वाघच म्हटलं पाहिजे. कारण त्यांनी इंधनाचे दर कमी केले आहेत. शेतकऱ्यांची परिस्थितीही अशीच आहे. भाजपने मदत केली पण त्याच्या दहा टक्केही मदत महाविकास आघाडीने केलेली नाही. हे महाविकास आघाडी सरकरा फेल झालं आहे. तुम्ही सण सोडून इथे संप करताय त्याबद्दल तुमचं कौतुक केलं पाहिजे. आम्ही राज्यभरात तुमच्या पाठिशी आहे. आमचे नेते एसटी कर्मचाऱ्यांसोबत आहे. हा लढा सुरु ठेवा. तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे आहे ही ग्वाही देतो.

पुढे ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी प्रयत्न केले नाहीत, त्यामुळे त्यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी मी करतो. हुकूमशाही पद्धतीने हे सरकार काम करत आहे. कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत आहे. ही कारवाई पक्षाकडून होत आहे असेही महाडिक म्हणाले आहेत.

हेही वाचा: तटकरेंविषयी नाराजीची किनार

loading image
go to top