ST Ticket : एसटीचे आता डिजिटल तिकीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Digital Ticket of ST msrtc Extension of Smart Card till 31 kolhapur

ST Ticket : एसटीचे आता डिजिटल तिकीट

कोल्हापूर : एसटी प्रवासात तिकीट काढताना सुटे पैसे नसल्यास अनेकदा वाहक व प्रवाशांची कोंडी होते. दोन्हींत वाद होतात, ही समस्या नियमित आहे. यावर मात करण्याचा भाग म्हणून एसटी महामंडळातर्फे डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट देण्याची सेवा सुरू होत आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यभरात पाच हजार ॲण्डरॉईड डिजिटल तिकीट मशिन दिली आहेत. कोल्हापुरात १५० मशिन लवकरच येणार आहेत.

या नव्या मशिनमुळे प्रवाशांना रोखीने पैसे देण्याऐवजी ‘यूपीआय'', ‘क्युआर कोड’ याचा वापर करून तिकीट काढता येणार आहे. ईबीक्सकॅश व स्टेट बॅंक ऑफ इंडियांच्या सहकार्याने ही पहिल्या टप्प्यात पाच हजार डिजिटल तिकीट मशिन एसटी महामंडळाला मिळाली. दोन वर्षात सर्वत्र मोबाईलद्वारे पैसे देणे घेण्याचे व्यवहार सुरू झाले.

नव्या सुविधेनुसार वाहकाकडे डीजीटल तिकीट मशिनवर क्युआर कोड किंवा यूपीआयद्वारे प्रवाशांना डिजिटल प्रणालीद्वारे पैसे देत तिकीट घेता येणार आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारातील ताण कमी होणार आहे. प्रवाशांच्या होणारा मनस्ताप कमी होणार आहे. तसेच त्यासोबत महामंडळाचे काम सुलभ होण्यास मदत होणार आहे, अशी सेवा उपलब्ध करण्यासाठी एसटीचे व्यवस्‍थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी पुढाकार घेतला आहे.

स्मार्ट कार्डाला ३१ पर्यंत मुदतवाढ

ज्येष्ठ नागरिकांना एसटी भाड्यात सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड देण्यात येते. या योजनेसाठी नोंदणी करणे तसेच कार्डचे वितरण करण्यासाठी एसटी महामंडळाने ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढी दिली आहे.

सुट्या पैशाची कटकट मिटणार

एसटीचे तिकीट काढताना मात्र रोखीने पैसे द्यावे लागतात. अनेकदा पाच, दहा रुपयांच्या तिकिटासाठी प्रवासी शंभर, दोनशे किंवा पाचशेच्या नोटा वाहकाला देतात. तेव्हा सुटे पैसे परत देण्यासाठी वाहकाला कसरत करावी लागते. अशात डिजिटल पेमेंटची सुविधा वाहकांकडे सध्‍या नसल्याने अनेकदा डिजिटल व्यवहारही करता येत नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. आता डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट सुरू होऊन सुट्यां पैशाची कटकट मिटणार आहे.

Web Title: Digital Ticket Of St Msrtc Extension Of Smart Card Till 31 Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..