कोल्हापुरात सहा टन तिळगुळाचे वाटप!

प्रत्येक वर्षीच्या तुलनेत विक्रीत झाली घट
til-gul-ghya-god-bola
til-gul-ghya-god-bolasakal

कोल्हापूर : राज्यात यंदा ओमिक्रॉन (Omicron) सावट असूनही मकर संक्रांतीला(makar sankranti) ‘तिळगुळ घ्या, गोड बोला‘ अशा शुभेच्छांनी जिल्ह्यात संक्रात साजरी झाली. सुमारे पाच ते सहा टन साखरेच्या तिळगुळाचे वाटप केले, असे तिळगुळ विक्रेत्यांनी सांगितले. मकर संक्रात सणाच्या दरम्यान थंडी असल्याने तिळांचा वापर जादा केला जातो. यंदाच्या संक्रांतीच्या सणाला एकूण पाच ते सहा टन साखरेच्या तिळगुळाची निर्मिती झाली. जिल्ह्यात घराघरात अबालवृध्दांनी एकमेकांविषयीचे प्रेम, वडिलधाऱ्या विषयी नम्रता, शेजाऱ्याबद्दल स्नेह, आपुलकी वाढावी, यासाठी मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळाचे वाटप केले.

til-gul-ghya-god-bola
पुणे : शहरात उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यात कपात नाही

त्यात तिळाची रेवडी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, रजवाडी रेवडी, रजवाडी चिक्की, चपटी रेवडी व अनेक साखरेपासून बनविलेल्या पदार्थांचा समावेश होता. ओमिक्रॉनमुळे शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीमुळे संप असल्याने तिळगुळाच्या एकूण विक्रीत घट झालेली दिसते.

ओमिक्रॉन व एसटी संपामुळे तिळगुळाच्या निर्मितीवर थोडा परिणाम जाणवला. जिल्ह्यातील तिळगुळ विक्रेत्यांना त्याचा फटका बसला.

-अनिल बाबूराव उरुणकर, पेढेवाले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com