Kolhapur News : ‘ई श्रमिक' नोंदणीत जिल्ह्याची आघाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

District leads  E Shram registration kolhapur
कोल्हापूर : ‘ई श्रमिक' नोंदणीत जिल्ह्याची आघाडी

कोल्हापूर : ‘ई श्रमिक' नोंदणीत जिल्ह्याची आघाडी

कोल्हापूर : केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई-श्रमिक पोर्टलवर जिल्ह्यातील दोन लाख ७५ हजार ५७४ जणांची नोंदणी झाली आहे. स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांनी यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. देशातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षीत करण्यासाठी केंद्र सरकारने ई श्रमीक पोर्टलची निर्मिती केली. सर्व श्रमिकांनी पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन केले. मात्र असंघटीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अल्पशिक्षीत काम करतात. त्यांना ही नोंदणी करणे अवघड आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांची संख्या पाहता शासकीय यंत्रणा यासाठी तोकडी होती.

हेही वाचा: पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...

नोंदणीतील या अडचणी लक्षात घेऊन विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला. त्यांनी विशेष शिबिराचे आयोजन केले.झोपडपट्ट्या, गावागावातील शेतमजुरांच्या वस्त्या, ऊसतोडणी कामगार यांच्यात प्रबोधन करून त्यांनी नोंदणी केली. याशिवाय असंघटीत क्षेत्रातील व्यावसायिकांशी संपर्क करून त्यांच्याकडूनही नोंदणी करून घेतली.यात शेतमजूर, बांधकाम कामगार, खासगी आस्थापनातील कामगार यांच्यासह अन्य कामगार, मजूर, कारागिरांचा समावेश आहे. या नोंदणीनंतर प्रत्येकाला श्रमिक कार्ड दिले जाणार आहे. नोंदणीत जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. या अंतर्गत पेन्शन योजनाही राबवली असून वयोमानानुसार ५० ते २०० रुपयापर्यंतचा हप्ता आहे. यात शासनाकडून तेवढीच रक्कम देण्यात येते. त्यामुळे निवृत्तिवेतन मिळते.

हेही वाचा: कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष

हे आहेत लाभ

  • अपघाती विमा संरक्षण

  • अपघातात मृत्यू झाल्यास दोन लाखांचा विमा

  • अपघातात अपंगत्व आल्यास एक लाखाचा विमा

  • ६० वर्षांनंतर तीन हजार रुपयांचे पेन्शन

समाजातील शेवटचा घटक म्हणजे असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत. त्यांच्या जीवनात कोणत्याच प्रकारची शाश्वती नाही. ई श्रमिक पोर्टलवरील नोंदणीमुळे त्यांना काही प्रमाणात सुरक्षा मिळणार आहे. सामाजिक संघटनांनी घेतलेल्या पुढाकाराने या कष्टकरी वर्गाची नोंदणी करणे सहज शक्य झाले.

- अमित कांबळे, अध्यक्ष, युगारंभ फाउंडेशन, पाडळी खुर्द

Web Title: District Leads E Shram Registration Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top