लोकशाही वाचवण्यासाठी "हम अगर उठ्ठे नही तो'

District President of Indian Women Federation Sunita Amritsagar press conference in kolhapur
District President of Indian Women Federation Sunita Amritsagar press conference in kolhapur

कोल्हापूर : लोकशाही अन्‌ राज्यघटना अभूतपूर्व संकटाचा सामना करीत आहे. आजच्या सत्ताधारी पक्षाला, राजवटीला आमचे संविधान मान्य नाही. घटनेतील पायाभूत तरतुदी म्हणजे लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, प्रजासत्ताक, मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे, स्वतंत्र न्यायदान यंत्रणा मान्य नाहीत. धर्माच्या, राष्ट्रवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. देशामध्ये सामाजिक अशांतता, हिंसा, झुंडशाही वाढली आहे. यासाठी संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी "हम अगर उठ्ठे नही तो' या देशव्यापी मोहिमेचे आयोजन केले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. 


भारतीय संविधान आणि त्यातील मुल्ये यांचे संरक्षण करण्यासाठी पाच सप्टेंबरला "प्रतिकार दिन' आयोजित केला आहे. यादिवशी शासनाला निवेदन देऊन मागण्यांची सनद जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय महिला फेडरेशनच्या जिल्हाध्यक्ष सुनिता अमृतसागर यांनी दिली. महिलांच्या हक्कासाठी, त्यांनी सन्मानाने जगण्यासाठी एका मोहिमेची आवश्‍यकता महिला संघटनांना वाटली म्हणूनच पाच सप्टेंबरला देशातील अनेक संघटना "हम अगर उठे नही तो' यामध्ये सर्व स्तरातील महिला सहभागी होत आहेत.

27 ऑगस्टपासून ते पाच सप्टेंबरपर्यंत ही मोहीम सुरु राहील. जीवन, रोजगार, लोकशाही अशी मागणी केली आहे. यासाठी 28 ऑगस्टला संघर्षाची हाक दिली आहे. देशभरातून 150 पेक्षा अधिक महिला संघटना, एलजीबीटीक्‍युआयए समुदाय, मानवाधिकार संस्था एकत्र येऊन देशव्यापी मोहीम सुरु केली आहे. दोन वर्षांपूर्वी भारतीय महीला फेडरेशनसह भारतातील अनेक महिला संघटनांनी एकत्र येऊन देशभर "बाते अमन की' ही मोहीम चालवली होती. विविध महिलांच्या प्रश्नावर वास्तव मांडणारे पत्रके तयार केली आहेत.

यात सर्व घट सहभागी होतील. सोशल मीडियावर कार्यक्रम, गाणी, कलापथक, महिलांच्या मागण्यांवर आवाज उठवणारे व्हिडिओ, चर्चासत्राद्वारे विविध प्रश्नावर आवाज उठवला जाईल. पत्रकार परिषदेला जनरल सेक्रेटरी स्नेहल कांबळे, "अंनिस'च्या सीमा पाटील, दिपाली कोळी, सुनंदा चव्हाण, सुवर्णा तळेकर, शुभांगी पाटील आदी उपस्थित होत्या.


 संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com