
कोल्हापूर : प्रारुप प्रभाग रचना उद्या प्रसिद्ध होणार
कोल्हापूर : महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. यासाठी प्रारुप प्रभागरचना बनवली असून, मंगळवारी (ता. १) सर्व विभागीय कार्यालय, संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. येथे प्रारुप प्रभागाचा नकाशा, संपूर्ण शहरातील ३१ प्रभाग दर्शवणारा नकाशा लावला जाईल, अशी माहिती महापालिका निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा: पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...
१५ जानेवारीला प्रारुप आराखडा राज्य निवडणूक आयोगाला पाठववला. त्यानंतर निवडणूक आयोगाने प्रारुप आराखडा प्रसिद्ध करण्यासंदर्भात महापालिकेला पत्राद्वारे सूचना पाठवल्या त्याप्रमाणे प्रारुप आराखडा प्रसिद्ध होणार आहे. त्यापूर्वी येरवडा येथील शासकीय मुद्रणालयात गॅझेट केले जाईल. चार विभागीय कार्यालये आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रारुप आराखडा प्रसिद्ध केला जाईल. प्रत्येक प्रभाचा ३१ बाय३१ आकाराचा स्वतंत्र नकाशा लावण्यात येईल. संपूर्ण शहराचा नकाशाही येथे असेल. सोशल डिस्टन्सिंगचे पालक करून सर्वांना प्ररुप प्रभाग रचना पाहाता येईल. त्यानंतर १४ फेब्रुवारीपर्यंत महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात हरकती नोंदवता येणार आहेत. या सर्व हरकती राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात येतील. त्यानंतर हरकतींवर १६ ते २६ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी होईल. २ मार्चला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल.
हेही वाचा: कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष
अशी असेल प्रभाग रचना
एकूण प्रभाग - ३१
एकूण सदस्य - ९२
महिला सदस्य - ४६
२ सदस्यीय प्रभाग - १
अनुसूचित जमाती - १
अनुसूचित जाती - १२
प्रभागातील सरासरी लोकसंख्या - १७ हजार ९१०
Web Title: Draft Of Ward Structure Will Released Tomorrow Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..