प्रदूषणमुक्तीसाठी ‘बायोडायजेस्टर’चा प्रयोग

राजाराम रायफल्स कॉलनीत शोषखड्ड्याद्वारे सांडपाणी मुरवले जमिनीत
Experiment biodigestor pollution
Experiment biodigestor pollution sakal

कोल्हापूर : घर बांधल्यानंतर शौचालयासाठी ड्रेनेज बांधले जाते. त्याचे सांडपाणी गटारीत सोडले जाते. ते पाणी पुन्हा ओढ्याद्वारे नदीत मिसळते आणि प्रदूषणात भर पडते. मात्र, घरातील सांडपाणी त्याच परिसरात झिरपण्याची व्यवस्था केली तर शौचालयाचे सांडपाणी शोषखड्ड्याद्वारे जमिनीत मुरवले तर प्रदूषणाची समस्या राहणार नाही. विशेष म्हणजे कोल्हापुरातील राजाराम रायफल्स कॉलनीत राहणाऱ्या सिव्हिल इंजिनियर इंद्रजित नागेशकर यांच्यासह त्या परिसरातील २३ कुटुंबीयांनी ‘बायोडायजेस्टर’चा हा वेगळा प्रयोग केला आहे.

श्री. नागेशकर राजारामपुरीतील दुसऱ्या गल्लीत राहत होते. त्यांनी राजाराम रायफल्स कॉलनीत २००९ ला घर बांधले. मुख्य रस्त्यापासून चार फूट त्यांच्या घराचा तळ मजला आहे. ते सिव्हिल इंजिनिअर असल्याने त्यांची इमारत पर्यावरणपूरक बांधली. ती बांधताना शौचालयासाठी ड्रेनेज बांधले नाही. शोषखड्ड्याद्वारे सांडपाणी जमिनीत मुरेल, अशी व्यवस्था केली. घरातून जास्त प्रदूषण होणार नाही व ते पर्यावरणात मिसळणार नाही, याची काळजी घेताना त्यांनी कुंपणाला लागून छोटी तळी केली आहेत. त्यात विविध मासे सोडले आहेत. तेथे विविध प्रजातीच्या वनस्पती, वेली लावल्या आहेत. डासांचा उपद्रव कमी करण्यासाठी गप्पी मासेही तळ्यांत सोडले. पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटकांचा या परिसरात वावर आहे.

रेन हार्वेस्टिंगद्वारे पावसाचे पाणी साठवले

श्री. नागेशकर यांचे घर चार हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे. दररोज प्रतिमाणसी १२० लिटर पाणी त्यांच्या घरात वापरले जाते. रेन हार्वेस्टिंगद्वारे पावसाचे पाणी त्यांच्यात साठवले जाते.

शोष खड्ड्याद्वारे जमिनीत मुरणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण चांगल्या पद्धतीने होते. ही पद्धत जुनी आहे. त्याची अंमलबजावणी आम्ही केली आहे.

- इंद्रजित नागेशकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com