पहाटे फिरायला जाणाऱ्यांना आजऱ्यात गव्यांची धास्ती

Fear Of Gaur In The Morning For Those Who Go For A Mornig Walk Kolhapur-Ajara Marathi News
Fear Of Gaur In The Morning For Those Who Go For A Mornig Walk Kolhapur-Ajara Marathi News

आजरा : पहाटे उठल्यानंतर मोकळ्या हवेत फिरणे ही एक चांगली सवय आहे. अनेकांच्या जीवनात हा दररोजचा शिरस्ता झाला आहे. पण मॉर्निंग वॉक करतांना तितकीच पुरेशी काळजी घेण्याची वेळ आजरेकरांवर आली आहे. रस्त्यावर गव्यांचे कळप उतरत असल्याने खबरदारी घेवून मॉर्निंग वॉकला जावे लागत आहे. दोन दिवसांपुर्वी आजरा-पेरणोली रस्त्यावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ गवे रस्त्यावर आल्याने मॉर्निंग वॉर्कसना पळता भूई थोडी झाली. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले. याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

पहाटेची शुध्द हवा घेण्यासाठी अनेकांची धडपड असते. शहर असू दे ना खेडेगाव येथे पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आजरा शहरात देखील आजरा-गडहिंग्लज, आजरा-पेरणोली, आजरा-पोळगाव, आजरा-आंबोली, आजरा-महागाव रस्त्यावर मॉनिंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या सर्वच रस्त्यावर झाडे झुडपे अधिक आहेत. आजरा-पेरणोली मार्गानजीक जंगल परिसर आहे. त्यामुळे या मार्गावर शेतातून जंगलाकडे परतत असलेले गव्याचे कळप अनेकांना दिसले आहेत.

रविवार (ता.29) पहाटे पावणे सातच्या सुमाराला साळगावकडे फिरायला गेलेल्या महिलांना गव्याचा कळप आजरा-पेरणोली रस्ता ओलांडून जंगलाच्या दिशेन जातांना दिसला. समोर कळप पाहून अनेकांची भंबेरी उडाली. त्यामुळे फिरणे अर्धवट सोडून अनेक जणांना घरी परतावे लागले. त्यामुळे शहरात गव्यांच्या वावराने मॉर्निंग वॉकला जाणे धोक्‍याचे बनल्याचे अनेकांनी सांगितले. 

...निवडलेला मार्गही ठरतोय धोकादायक 
आजरा-आंबोली व गडहिंग्लज मार्गावर रहदारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गाड्या सुसाट असल्याने पादचाऱ्यांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी आजरा-पेरणोली मार्ग निवडला आहे. पण या मार्गावर गव्यांचे कळप उतरत असल्याने तो धोकादायक ठरत असल्याचे मॉर्निंग वॉकर्सनी सांगितले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com