esakal | घुणकीत मंगळवारपासून कडक जनता कर्फ्यू
sakal

बोलून बातमी शोधा

घुणकीत मंगळवारपासून कडक जनता कर्फ्यू

घुणकीत मंगळवारपासून कडक जनता कर्फ्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घुणकी (कोल्हापूर ) : घुणकी (ता. हातकणंगले) येथे कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत मंगळवार (ता.४) पासून चार दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असल्याची माहिती सरपंच श्रीमती राजाक्का रासकर यांनी दिली.

रासकर म्हणाल्या, ग्रामपंचायतीत बैठक होऊन निर्णय घेण्यात आला आहे.घरोघरी सर्वेक्षणाचे काम आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, व प्राथमिक शिक्षक करीत आहेत. लसीकरण ६९ टक्के झाले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. विनाकारण काही नागरिक, युवक रस्त्यावर व चौकात फिरताना निदर्शनास आले आहेत. याबाबतची तक्रार पेठवडगाव पोलीस ठाण्यात केली आहे.

हेही वाचा- ऑक्सिजन पातळी अचानक घसरतेय डॉक्टर चिंतेत : मध्यमवयीन रुग्णांबाबत आव्हान वाढतेय

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून मंगळवार ते शुक्रवारी (ता.७) पर्यंत जनता कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात दवाखाने, मेडिकल, दूध संस्था अत्यावश्यक सेवा चालू राहतील. सर्व प्रकारची किराणा दुकाने, बझारसह सर्व व्यवसाय बंद राहतील. कोणत्याही प्रकारे चौकात भाजीपालासह अन्य विक्रीसाठी थांबू नये.अनावश्यक फिरणाऱ्यांवर तसेच व्यावसायिकांनी बंदला प्रतिसाद न दिल्यास दंडात्मक कारवाई पोलीसांच्यावतीने करण्यात येणार आहे. असेही श्रीमती रासकर यांनी सांगितले.यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी ए.एन.गोरे, आरोग्य सेवक अनिल शिंदे उपस्थित होते.

Edited By- Archana Banage

loading image