Kolhapur : इराणी खण परिसर बंदिस्त

आज मूर्ती विसर्जन; सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार
Kolhapur : इराणी खण परिसर बंदिस्त
Kolhapur : इराणी खण परिसर बंदिस्त

कोल्हापूर : सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांना रविवारी कोल्हापूरकर निरोप देणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी यंदाही मिरवणुकांना फाटा दिला जाणार असून इराणी खणीतच मूर्तींचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण खण परिसर बंदिस्त केला असून संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. दरम्यान, महापालिकेने विसर्जनाची सर्व तयारी पूर्ण केली आहे.

इराणी खण येथे पाच जेसीबी, बारा डंपर, सहा पाण्याचे टॅंकर, दोन बूम अशी व्यवस्था असेल. त्याशिवाय ठिकठिकाणाहून मूर्ती आणण्यासाठी नव्वद टेम्पो असतील. प्रत्येक टेम्पोमध्ये २ असे एकूण १८० हमाल कार्यरत असतील. सात वैद्यकीय पथके येथे कार्यरत राहणार असून टवाळखोरांवर नजर ठेवण्यासाठी निर्भया पथकांची मदत घेतली जाणार आहे. इराणी खण परिसराकडे जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आहे.

Kolhapur : इराणी खण परिसर बंदिस्त
साताऱ्याच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण

आपत्कालीन यंत्रणा

इराणी खणीतच विसर्जन होणार असल्याने या परिसरात सर्वाधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खण परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठीची खबरदारी घेण्यात आली आहे. आपत्कालीन यंत्रणाही या परिसरात कार्यरत असेल. विभागनिहाय विसर्जन कुंडांसाठीही महापालिकेने विविध संस्थांना आवाहन केले असून त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com