Ganesh visarjan 2022 : मिरवणूक मार्गावर तीन हजार पोलिसांची फौज

सीसीटीव्हींचा वॉच; जनरेटरसह रुग्णवाहिकेची सुविधा देणार
Ganesh visarjan 2022 Three thousand police force on the procession route kolhapur
Ganesh visarjan 2022 Three thousand police force on the procession route kolhapursakal

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सर्व मार्गांवर तीन हजार पोलिसांची फौज बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मार्गांसह महत्त्‍वाच्या ठिकाणी दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकेही तैनात करणार आहेत. मिरवणूक मार्गावर खबरदारीचा भाग म्हणून जनरेटर आणि रुग्णवाहिकेचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

मिरवणूक पाहण्यासाठी जिल्ह्यातून लोक येतात. मिरवणूक उत्साहात आणि शांततेत व्हावी, यासाठी पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यासाठी होमगार्डसह, बाहेरील बंदोबस्ताची मदत घेतली आहे. पोलिस मित्र व स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवकांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.

१७०० होमगार्ड

मिरवणुकीतील पोलिसांचा बंदोबस्ताचा ताण कमी करण्यासाठी १७०० होमगार्डची मदत घेतली जाणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी महिला आणि पुरुष होमगार्डचे नियोजन केले आहे.

२०० सीसीटीव्ही

विसर्जन मिरवणुकीसाठी पारंपरिकसह दोन समांतर मार्गांवर दोनशेहून अधिक ठिकाणी सीसीटीव्‍ही कॅमेरे बसविले आहेत. त्याचबरोबर सेफ सिटी अंतर्गत शहरात बसविलेल्या कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. या कॅमेऱ्यांचे पोलिसांकडून नियंत्रण केले जाणार आहे. आवश्यक त्यानुसार पोलिस कंट्रोल रुममधून पोलिसांची फौज कमी जास्त करण्यात येणार आहे.

३० टॉवर

देखाव्यांवरील गर्दीसह मिरवणूक मार्गावर वॉच ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने ३० हून अधिक टॉवर उभे केले आहेत. येथून शस्‍त्रधारी पोलिस दुर्बिनीतून मिरवणुकीवर लक्ष्य ठेवणार आहेत. त्याचबरोबर मिरवणुकीचे चित्रीकरणही पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

जनरेटरची सुविधा...

मूर्तीची उंची, स्‍ट्रक्‍चरचा विजेच्‍या तारांना होणारा स्‍पर्श टाळण्‍यासाठी मिरवणूक मार्गावर अनेकदा वीजपुरवठा खंडित करावा लागतो. यामुळे गोंधळ होण्याचे धोके वाढतात. पण या वर्षी महापालिका आणि पोलिस प्रशसानाकडून मिरवणुकीवर स्‍वत:ची जनरेटर व प्रकाश यंत्रणाही ठेवली जाणार आहे.

सहा ठिकाणी रुग्‍णवाहिका

मिरवणुकीत जर कोणाला वैद्यकीय मदतीची गरज भासल्‍यास त्याला ती तत्काळ मिळाली पाहीजे. या हेतूने शहरातील मुख्य चौक, गर्दीची सहा ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे.

छेडछाडी, चोरट्यांवर वॉच

गर्दीच्या ठिकाणी छेडछाडीचे अथवा चोरीचे प्रकार घडू नयेत यासाठी निर्भया आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके साध्या गणवेशात तैनात आहेत.

गोंधळ घालणाऱ्या मंडळांवर कारवाई

मिरवणुकीत जाणीवपूर्वक अडथळा, वाद निर्माण करणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्या मंडळांवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जाईल. तसेच या मंडळांना मिरवणुकीत लवकर प्रवेश दिला जाणार नाही, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

बंदोबस्त...

  • पोलिस अधीक्षक - १

  • अपर पोलिस अधीक्षक - २

  • उपअधीक्षक - ८

  • पोलिस निरीक्षक - ३१

  • सहायक/उपनिरीक्षक - १०५

  • पोलिस कर्मचारी - २२००

  • राज्य राखीव दल तुकडी - २

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com