घुणकी : किणी, तासवडेला टोलमध्ये वाढ

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून नाके ताब्यात; वाढीव दराने वसुली सुरू
toll naka
toll nakaSakal

घुणकी : राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (दिल्ली) यांनी पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) व तासवडे (जि. सातारा) येथील टोलनाक्यांचा ताबा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून आज घेतला. त्यानंतर गुरुवारी (ता. २३) मध्यरात्रीपासून दरवाढही केली. ही दरवाढ जीपसाठी १० रुपये तर ट्रक, बससाठी १५ रुपये आहे.

दरम्यान, डिझेल, पेट्रोल दरवाढीने मेटाकुटीला आलेल्या वाहनधारकांना दरवाढीचा फटका बसणार आहे. यापूर्वी ट्रक, बससह अवजड वाहनांसाठी एकच दर होता. नवीन दरवाढीमध्ये व्यावसायिक वाहनांची वर्गवारी केली आहे. त्यानुसार दरवाढ केली आहे. किणी, तासवडेला टोलमध्ये वाढ पुणे-बंगळूर महामार्गावरील सातारा ते कागल दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण दिल्ली यांच्या माध्यमातून रस्ते विकास महामंडळाने केले. चौपदरीकरणावर झालेल्या खर्चासाठी तासवडे (जि. सातारा) व किणी (ता. हातकणंगले) येथे पथकर वसुली नाके उभारण्यात आले.

पथकर वसुलीसाठी रस्ते विकास महामंडळाला २ मे २००२ ते २ मे २०२२ दरम्यान मुदत देण्यात आली. कोरोनाच्या काळात झालेल्या नुकसानभरपाईसाठी २४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे २५ जूननंतर पथकर बंद होईल, अशी वाहनधारकांत चर्चा असतानाच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण दिल्लीने आज पथकराचे नियोजन रस्ते विकासकडून ताब्यात घेतले आणि घसघशीत दरवाढ केली. दरवाढीने वाहनधारकांतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

नवे दर (रुपयात)

*वाहन प्रकार * एक मार्गी * परतीसह

*मोटार, जीप *९० *१३५

* एल.सी.व्ही व मिनी बस * १४५ *२२०

* बस, ट्रक * ३०५ * ४६०

* तीन एक्सल, व्यावसायिक वाहने * ३३५ * ५००

एच.सी.एम/ इएमइ/ एमएव्ही (४x६एक्सेल्स) * ४८० * ७२०

ओव्हरसाईज्ड व्हेइकल (७ एक्सेल्स) * ५८५ *८७५

डिझेल, पेट्रोल दरवाढीने वाहनधारक होरपळले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. काहींनी व्यवसाय बंद केला आहे. टोल बंद करण्याऐवजी त्यात दरवाढ केल्याने वाहनधारक अडचणीत आले आहेत. दरवाढीपेक्षा टोलच बंद करून शासनाने दिलासा द्यावा.

- सुभाष जाधव, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com