esakal | ‘गोकुळ’चा ताबा घेऊ पाहणाऱ्यांना धडा शिकवा
sakal

बोलून बातमी शोधा

Guardian Minister satej patil

"गोकुळ’चा ताबा घेऊ पाहणाऱ्यांना धडा शिकवा"

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे; पण सत्तारूढ गटाने ‘गोकुळ’ला मल्टिस्टेट करून तो स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा डाव रचला होता. या निवडणुकीत अशा स्वार्थी प्रवृत्तीला धडा शिकवा. सत्ताधारी गटाशी संघर्ष करून सर्वसामान्य दूध उत्पादकांचा ‘गोकुळ’च्या निवडणुकीतील हक्क अबाधित ठेवल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दक्षिणमधील ठरावधारकांशी त्यांनी संवाद साधला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांनी अत्यंत कष्टातून ‘गोकुळ’ची उभारणी करून संघाला नावलौकिक मिळवून दिला; पण काही व्यापारी प्रवृत्ती ‘गोकुळ’मध्ये घुसल्या आणि त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ‘गोकुळ’चा वापर केला. एवढ्यावर न थांबता त्यांनी गोकुळ स्वतःच्या मालकीचा राहावा, यासाठी मल्टिस्टेटचा घाट घातला. त्यासाठी त्यांनी मोठ्या ताकदीने प्रयत्न केले; पण जिल्ह्यातील स्वाभिमानी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठबळावर आम्ही लढा उभारला आणि तो यशस्वी केला. हा लढा अजून संपलेला नाही. या प्रवृत्तीला ‘गोकुळ’मधून कायमचे कायमचे हद्दपार करूया.’’