बँक निवडणुकीसाठी मुंबईत खलबत्तं

आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा
political
politicalesakal

कोल्‍हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) व ‘जनसुराज्य’ चे आमदार डॉ. विनय कोरे (Vinay Kore) यांच्यात मुंबईत (Mumbai) बैठक झाली. बैठकीत पतसंस्था व प्रक्रिया संस्था गटातील दोन जागांवर श्री. कोरे यांनी आग्रही भूमिका घेतल्याचे समजते. (District Bank election 2021) गुरूवारी आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांच्याशी श्री. कोरे व आमदार पी. एन. पाटील (P.N. Patil) यांच्यातील चर्चेनंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

बँकेच्या निवडणुकीतील रणनिती ठरवण्यासाठी शनिवारी हसन मुश्रीफ, विनय कोरे, पी. एन. व पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्यात बैठक झाली. जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीला खासदार संजय मंडलिकही उपस्थित होते. त्यानंतर सोमवारी पालकमंत्र्यांसह कोरे, मुश्रीफ यांनी अर्ज दाखल केले व दुपारी कोरे-मुश्रीफ एकाच विमानातून मुंबईला रवाना झाले. सायंकाळी पुन्हा कोरे-मुश्रीफ यांच्यात मुश्रीफ यांच्या सरकारी निवासस्थानी दोन तास बैठक झाली. शनिवारी झालेल्या बैठकीचा उहापोह यात झाला पण खरी चर्चा प्रक्रिया व पतसंस्था गटातील उमेदवारीवरून झाल्याचे समजते.

political
Air India नंतर मोदी सरकार आणखी एक मोठी कंपनी विकणार!

विकास संस्था गटातील १२ जागांपैकी किमान आठ जागांवर निवडणूक लागण्याची शक्यता आहे. उर्वरित ९ जागांवर कोणाला संधी द्यायची, हाच मुद्दा या दोघांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी होता. पूर्वीच्या सभागृहात कोरे यांना विकास सोसयटी गटातील शाहुवाडी, पन्हाळा या दोन जागांसह अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व पतसंस्था गटातील जागा दिली होती. अर्थिक दुर्बलमधून त्यावेळी भगवानराव सरनोबत तर पतसंस्था गटातून प्रा. जयंत पाटील यांना श्री. कोरे यांचे उमेदवार म्हणून संधी दिली होती.

गेल्या निवडणुकीत प्रा. पाटील यांचा चार मतांनी पराभव झाला तर अर्थिकदुर्बल ही जागाच रद्द झाली. आता श्री. कोरे यांनी पतसंस्था गटातून पुन्हा प्रा. पाटील, प्रदीप पाटील-भुयेकर यांच्यासाठी प्रक्रिया गटातून फिल्डींग लावली आहे. या दोन जागा देणे शक्य नसेल तर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटाची तरी जागा मिळावी अशी अपेक्षा श्री. कोरे यांनी बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. ही जागा मिळाल्यास श्री. भुयेकर यांचा ओबीसीचा दाखला असल्याने त्यांनाच संधी द्यावी अशीही श्री. कोरे यांची मागणी आहे.

political
मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 10 लाखांची मदत

विलास गाताडे यांचे काय होणार?

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातून विलास गाताडे संचालक आहेत. श्री. गाताडे आमदार प्रकाश आवाडे यांचे कट्टर समर्थक आहेत. श्री. आवाडे यांनी आज पतसंस्था-नागरी बँक गटातून अर्ज भरला. यापूर्वी ते नागरी बँक गटातून संचालक होते. श्री. कोरे यांच्या मागणीनुसार इतर मागासवर्गीय गटाची जागा त्यांना दिल्यास श्री. गाताडे यांचे काय होणार ? हा प्रश्‍न आहे. यावरही गुरूवारी आवाडे-कोरे-पीएन यांच्यातील चर्चेत मार्ग निघण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com