हातकणंगले आरोग्य विभागाच्या पथकाने काढला कारवाई विना पळ

संतप्त झालेल्या ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहुन आरोग्य पथकाने पळ काढला
हातकणंगले आरोग्य विभागाच्या पथकाने काढला कारवाई विना पळ

आळते : (ता. हातकणंगले) येथील खाजगी हॉस्पीटल व मेडीकल स्टोअर्सच्या तपासणीसाठी आलेले तालुका आरोग्य अधिकारी (tehsil health officer) डॉ. सुहास कोरे व त्यांच्या पथकावर ग्रामस्थांनी हल्लाबोल करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केला. संतप्त झालेल्या ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहुन आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई विनाच काढता पाय घेत पळ काढला. या घटनेमुळे गावात तणावपुर्ण शांतता असुन हातकणंगले पोलिसांनी (hatknagale police) घटनास्थळी व प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवुन माहिती घेतली.

याबाबत आधिक माहिती अशी की, आळते येथील डॉ. कोळाज यांच्याबाबत जिल्हाधिकांऱ्यांकडे तक्रार आली होती. त्या अनुषंगाने तहसिलदारांच्या सूचनेनुसार हातकणंगले पं. स. वैद्यकीय आधिकारी डॉ. सुहास कोरे व त्यांचे पथक आज दुपारी आळते (ता. हातकणंगले) येथे खाजगी हॉस्पीटल व मेडीकल स्टोअर्सच्या तपासणीसाठी दोन सरकारी गाड्यांच्या ताफ्यातुन दाखल झाले. त्यांनी प्रथम एका मेडीकल स्टोअर्समध्ये कोणकोणती औषधे ठेवली जातात. याची विचारणा करून कोविडची लक्षणे असलेल्या औषधांची डॉक्टरची चिठ्ठी आल्यास प्रथमतः ती आमच्या मोबाईलवर पाठवायची सुचना देवून पथक खाजगी डॉक्टरांच्या ओपीडीमध्ये तपासणीसाठी गेले.

हातकणंगले आरोग्य विभागाच्या पथकाने काढला कारवाई विना पळ
ब्रेकिंग: कोल्हापूर लॉकडाऊन विषयी जिल्हाधिकाऱ्यांचा नवीन आदेश

पथकाची तपासणी सुरु असताना अचानकपणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने हॉस्पीटलमध्ये व रस्त्यावर जमा झाले. पथक कारवाई करणार हे समजताच ग्रामस्थ आक्रमक झाले. आक्रमक झालेले ग्रामस्थ डॉ. कोरे यांच्या अंगावर धावुन जावु लागले. तर एकजण पथकाच्या गाडीच्या पुढे झोपुन आत्महत्या करणार असे ओरडु लागला. चिडलेले ग्रामस्थ व डॉक्टर यांच्यामध्ये वादावादी बराच वेळ चालु होती. अखेर पोलिस पाटील रियाज मुजावर व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी समझोत्याची भुमिका घेत वादावर पडदा टाकला. पण डॉ. कोरे यांच्या पथकाने ग्रामस्थांच्या गर्दीतुन सुटका करून घेवुन कारवाईविना पळ काढला.

याबाबत तालुका आरोग्य आधिकारी डॉ. सुहास कोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, ग्रामस्थांचा गैरसमज झाला होता. त्यांना समजावुन सांगितले आहे. सदरची भेट ही नियमित तपासणीचा भाग आहे. घडलेल्या प्रकारामध्ये जमावाची आक्रमक मानसिकता होती. पण त्याचा विचार करून चालणार नाही. सध्याच्या परिस्थितीत कोविड विरुद्ध लढायचे आहे. रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

हातकणंगले आरोग्य विभागाच्या पथकाने काढला कारवाई विना पळ
तुमच्या स्किनटोननुसार 'असे' निवडा योग्य सीरम

"आलेल्या तक्रारीची दखल घेणे हे यंत्रणेचे काम आहे. मात्र काहीजणांना आडवे येण्याची सवय आहे, त्यांना शासकिय कामांत अडथळा केल्यास गुन्हे दाखल करण्याची ताकिद दिली आहे."

- प्रदिप उबाळे, तहसिलदार, हातकणंगले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com