esakal | माजी सैनिकाच्या मृत्यूला हाॅस्पिटलच जवाबदार; 'आरोग्यचा' धक्कादायक खुलासा

बोलून बातमी शोधा

माजी सैनिकाच्या मृत्यूला हाॅस्पिटलच जबाबदार; 'आरोग्यचा' धक्कादायक खुलासा
माजी सैनिकाच्या मृत्यूला हाॅस्पिटलच जबाबदार; 'आरोग्यचा' धक्कादायक खुलासा
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोल्हापूर : माजी सैनिकाचा शहरातील एका खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनाने फेटाळला आहे. याबाबत उपायुक्त निखिल मोरे यांनी खुलासा केला असून, हा मृत्यू ऑक्सिजनचा पुरवठा अभावी नव्हे तर अक्सिजन मशीन जोडणी हाताळणीत चुकीच्या पद्धतीमुळे झाली असावी असा दावा केला आहे.

हेही वाचा- देवा, मम्मी पप्पांना कुठे शोधू! दोन चिमुकल्यांची केविलवाणी साद

गिरगाव तालुका करवीर येथील 75 वर्षीय माजी सैनिकाला शहरातील एका खाजगी रुग्णालयात सव्वीस एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.काल रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावली होती.आज सकाळी ऑक्सिजनसाठी रुग्णालय प्रशासनाने दीड तास प्रयत्न केले. पण ऑक्सिजन मिळाला नाही त्यातच या रुग्णाचा मृत्यू झाला असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नोंद केले आहे.मात्र जिल्ह्याच्या प्रशासनाने ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचा दावा फेटाळला आहे.

प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे की,

हॉस्पिटल प्रशासनाला कालच सात जम्बो सिलेंडर एजन्सीकडून सप्लाय झाले होते. रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि ऑक्सिजनचा साठा पाहता आज दुपारी बारा पर्यंत या सर्व रुग्णांना ऑक्सिजन मिळेल एवढा साठा त्यांच्याकडे होता. दवाखान्याच्या प्रशासनाकडून ऑक्सीजन मशीन जोडणीच्या हलगर्जीपणामुळे या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शी निदर्शनात येत आहे. याबाबत पंचनामा करून माहिती घेण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.

Edited By- Archana Banage