40 हजार रोकडसह संसाराची राखरांगोळी 

House fire in kagal
House fire in kagal

 
कागल (कोल्हापूर)  : येथील एका घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीत सत्तर हजार रुपयांचे प्रापंचिक साहित्य आणि रोख चाळीस हजार रोकड जळून खाक झाले. मुलांची महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे जळाली. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आणली. आगीत सुदैवानं जीवित हानी झाली नाही. ही घटना येथील गिरीजानगरमध्ये सकाळी नऊच्या सुमारास घडली. 
गिरीजानगरमध्ये लक्ष्मण मारुती खापणे पत्नी, दोन मुले, मुलगी आणि सून असे सहा जण राहतात. खापणे यांची घरगुती खानावळ चालवतात. आज सकाळी स्वयंपाकघरात खापणे यांच्या पत्नी जेवण बनवत होत्या. नऊच्या सुमारास घरातील पाठीमागील खोलीत अचानक आग लागली. बघता बघता आग पसरली. आग लागताच घरातील सर्वजण बाहेर पडले.

दरम्यान कागल नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आणली. शक्‍य तितके घरातील साहित्य बाहेर आणले. आगीत सुमारे 70 हजार रूपयांचे प्रापंचिक साहित्य आणि रोख 40 हजार रूपये जळून खाक झाले. या आगीत मुलांची शैक्षणिक आणि अन्य कागदपत्रेही जळाली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे स्पष्ट झाले. कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. 

बारावीची पुस्तके नोटस जळाल्या 
लक्ष्मण यांची मुलगी काजल बारावी सायन्सला आहे. उद्या तिची परीक्षा सुरू होत असताना आज तिची सर्व पुस्तके नोटस आगीत खाक झाल्या. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com