किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार? 'या' चौकशीसाठी राऊत जाणार थेट कोर्टात! Sanjay Raut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut vs Kirit Somaiya

आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी लाखो करोडो रुपये गोळा केले.

Sanjay Raut : किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार? 'या' चौकशीसाठी राऊत जाणार थेट कोर्टात!

Sanjay Raut Visit Kolhapur : काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा बँकेवरून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. याप्रकरणी मुश्रीफांची चौकशीही सुरु आहे. कोल्हापुरात हा मुद्दा गाजत असतानाच आता संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांनाच खुलं आव्हान दिलंय.

शिंदे-भाजपा सरकारनं तपास यंत्रणांच्या माध्यमातून किरीट सोमय्यांसारख्या 28 चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलीये. शिवगर्जना यात्रेच्या निमित्तानं संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

राऊतांनी आयएनएस विक्रांतवरून (INS Vikrant) भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी कोणतेही आरोप करण्यापेक्षा विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा कुठे ठेवला हे आधी सांगावं, असं राऊतांनी म्हटलंय.

आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी लाखो करोडो रुपये गोळा केले, त्याची चौकशी सुरू असताना सरकार बदललं आणि चौकशी थांबली. पण, मी स्वतः विक्रांतचे पैसे कुठे गेले आहे विचारणार आहे. मी त्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय. राऊतांच्या या आरोपांना सोमय्या काय उत्तर देतात हे पहावं लागणार आहे.