इचलकरंजी : हनी ट्रॅपद्वारे व्यापाऱ्याचे दोन लाख रुपये लुबाडले

इचलकरंजीत दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा
honey trap
honey trapsakal media

इचलकरंजी : हनी ट्रॅपद्वारे एका व्यापाऱ्याला दोन लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार आज येथे उघडकीस आला. याप्रकरणी हनी ट्रॅप करणाऱ्या टोळी विरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून व्यापाऱ्याची आर्थिक लूट केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला. त्यात शिवानंद हांजिगे, बबलू हांजिगे (सर्व रा. शहापूर), रियाज मुल्ला (रा. सोलगे मळा, इचलकरंजी) यांचा समावेश आहे.या टोळीकडून आणखी हनी ट्रॅपचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी शहापूरमधील एका महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून येथील एका व्यापाऱ्याशी ओळख झाली. त्यानंतर तिने प्रेमाचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची आर्थिक लुबाडणूक करण्यास सुरुवात केली. गेले वर्षभर हा प्रकार सुरूच होता. संबंधित महिलेने एकांतात भेटण्यासाठी या व्यापाऱ्याला हातकणंगले इथल्या एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्या ठिकाणी व्यापारी गेला. काही वेळातच शिवानंद हांजिगे, बबलू हांजिगे आणि रियाज मुल्ला तेथे आले. या सर्वांनी व्यापाऱ्याला धमकी देत मारहाण केली आणि सात लाख रुपयांची मागणी केली.

त्यावेळी चार लाख रुपयांवर तडजोड झाली होती. त्यानुसार व्यापाऱ्याने वेळोवेळी दोन लाख रुपये दिले. मात्र, उर्वरित पैशांसाठी जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. या सततच्या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली. हनी ट्रॅपच्या माध्यमातून लूट झालेल्या व्यापारी, नागरिकांनी तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन पोलिस उप अधीक्षक बाबूराव महामुनी यांनी केले आहे.

अखेर पोलिसांना यश

मोबाईलद्वारे हनी ट्रॅपच्या प्रकारातून शहरात आतापर्यंत दोन आत्महत्या झाल्या आहेत. या गुन्ह्यांच्या सखोल तपासापर्यंत पोलिसांना पोहोचता आले नाही. आता मात्र या हनी ट्रॅपचा प्रकार उघडकीस आणत टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अन्‌ टोळी आली उजेडात

फिर्यादीच्या तक्रारीनुसार रियाज मुल्ला तपासात समोर आला. पोलिसांनी सतर्कता दाखवत त्याची सखोल चौकशी केली. हळूहळू महिलेसह नावे उजेडात आली. तपासाअंती एक टोळी हनी ट्रॅप करून खंडणी मागत असल्याचे समोर आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com