esakal | इचलकरंजी: श्रमसाफल्य योजनेच्या जागेबाबत दिशाभूल
sakal

बोलून बातमी शोधा

ichalkaranji

इचलकरंजी: श्रमसाफल्य योजनेच्या जागेबाबत दिशाभूल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी: सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेच्या संभाव्य जागेबाबत पालिकेच्या नगररचना विभागाकडून दिशाभूल केली. त्यामुळे कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतचा जाब आज अधिकाऱ्यांना विचारत संताप व्यक्त केला. अखेर चुकीबाबत दिलगीरी व्यक्त करीत चार दिवसांत पर्यायी जागा सूचविण्याची हमी दिल्यानंतर या वादावर पडदा पडला.

हेही वाचा: 'नेमिष्टे गॅंग 'कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार

पालिकेकडील सफाई कर्मचाऱ्यांसाठी मालकी हक्काची घरकूले बांधून देण्यात येणार आहेत. २५ वर्षे सेवा झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १४३ लाभार्थी निश्चीत केले आहेत. यामध्ये आणखी काही लाभार्थी वाढण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी यापूर्वी झालेल्या बैठकीत स्वामी अपार्टमेंट परिसरातील खुली जागा नगररचना विभागाकडून सुचवली होती. पण प्रत्यक्षात या जागेवर क्रिडांगणाचे बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास आले.

यामुळे दिशाभूल करुन फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करीत कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आज आक्रमक झाले. त्यांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्याकडे सहाय्यक नगररचनाकार रणजीत कोरे यांना निलंबीत करण्याची मागणी केली. कारवाई केल्याशिवाय आम्ही नगराध्यक्ष दालनातून उठणार नाही, अशी भूमिका घेतली. चर्चेनंतर याबाबतची चूक लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी दिलगीरी व्यक्त केली.

दरम्यान, नगररचनाकार माया कुलकर्णी यांनी चार दिवसांत पर्यायी जागा सुचवण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर या वादावर पडदा पडला. चर्चेत रवी रजपूते, आण्णा कागले, ए. बी. पाटील, सुभाष मालपाणी, धनंजय पळसुले, नौशाद जावळे आदींनी भाग घेतला.

loading image
go to top