राज्यात नवी महापालिका होणार; इचलकरंजी महापालिकेवर शिक्कामोर्तब

इचलकरंजीला आज महापालिका करण्याबाबतचा आदेश नगर विकास विभागाने जारी केला.
Ichalkaranji latest update
Ichalkaranji latest updatesAKAL
Summary

इचलकरंजीला आज महापालिका करण्याबाबतचा आदेश नगर विकास विभागाने जारी केला.

इचलकरंजी - इचलकरंजी महापालिकेचा प्रस्ताव अखेर आज मार्गी लागला. इचलकरंजी ही राज्यातील २८ वी महापालिका झाली आहे. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. विशेष म्हणजे महापालिका करण्यासाठी सर्व पक्षीय मंडळींनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे महापालिका करण्याच्या प्रक्रियेत राजकीय अडथळा आला नाही. महापालिका करण्याबाबतचा आदेश आज नगर विकास विभागाने जारी केला. (Ichalkaranji latest update)

शासनाचे उपसचीव सतीश मोघे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश दिला असून महापालिकेचा पुढील कामकाज पाहण्यासाठी मुख्याधिकारी श्रेणीतील एस.व्ही. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर याबाबतच्या हालचाली गेल्या दोन दिवसांपासून सुरु होत्या. आज महापालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रशासकीय इमारतीवर आता महापालिका झाल्याचा फलक झळकणार आहे.

Ichalkaranji latest update
'उखाड दिया..', ठाकरे सरकार पडल्यानंतर संजय राऊत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

इचलकरंजीची शहराची लोकसंख्या सद्यस्थीतीला साडेतीन लाखांच्या पुढे गेली आहे. तर वाढत्या नागरिकरणांमुळे विविध नागरी सुविधा पुरवितांना पालिका प्रशासनावर ताण पडत आहे. त्यामुळे महापालिका करण्याचा प्रस्ताव पुढे आला. खासदार धैर्यशील माने यांनी यांनी याबाबतचा राज्य शासन पातळीवर यशस्वी पाठपुरावा केला. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी महापालिका करण्याबाबतची घोषणा केली.

पहिल्या टप्प्यात महापालिका करण्याचा शासनाने इरादा जाहीर करीत हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये केवळ सात हरकती व सूचना दाखल झाल्या. पण त्या जुजबी होत्या. त्यामुळे महापालिका करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर राज्य शासनाच्या पातळीवर महापालिकेच्या प्रस्तावावर पुढील कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानंतर आज महापालिका झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे लवकरच इचलकरंजीला राज्यात नवी ओळख मिळणार आहे. इचलकरंजी ही राज्यातील २८ वी महापालिका आहे.

Ichalkaranji latest update
नेमके हेच घडले!, तीन शब्दांतच राऊतांचा बंडखोरांना चपराक

इच्छुकांचा जीव भांड्यात पडला

आगामी निवडणूक महापालिका होणार असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. त्याला बराच कालावधी लागण्याची शक्यता गृहीत धरुन इच्छुकांनी शांत राहणे पसंद केले होते. पण प्रशासनाकडून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पालिकेचीच सार्वत्रिक निवडणूक होणार म्हणून तयारी सुरु केली आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. पण आता महापालिका म्हणून सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव भांडण्यात पडला आहे.

निवडणूक प्रक्रियेला स्थगीती मिळणार

सद्या पालिका प्रशासनाकडून पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. मतदार याद्या अंतीम करण्यात येत आहेत. आता महापालिका झाल्याचा आदेश निघाला आहे. त्यामुले पालिका निवडणूकीचा कार्यक्रम स्थगीत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Ichalkaranji latest update
धक्कादायक! मुंबईतील कांदिवली परिसरात आढळले 4 मृतदेह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com