
संदीप जगताप
इचलकरंजी : यंदा प्रथमच इचलकरंजी शहरात बांधकाम कामगारांसाठी भांडी संच वाटपाची योजना राबवली जात आहे. मात्र योजनेच्या अंमलबजावणीत मुख्यमंत्री यांच्या नियोजित दौऱ्यामुळे अडथळा निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भांडी संच वाटप करण्याचा घाट काही पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये नियोजित भांडी संच वाटपाचा कार्यक्रम आता पुढे ढकलला आहे.