सीबीनेट खरेदीत तांत्रिक अडथळा; रूग्ण वाढल्यास स्वॅब तपासणीचा पेच निर्माण होणार

येथील प्रयोगशाळेतील एका वरिष्ठाने विशिष्ट कंपनीचेच मशिन घ्यावे, असा आग्रह धरल्याने खरेदी लांबणीवर पडत आहे.
kolhapur
kolhapursakal

कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोल्हापूरकर सापडले असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत तिसरे स्वॅब तपासणी (सीबीनेट) मशिन बसवण्यात येणार आहे. जवळपास एक कोटी खर्चाच्या या मशिन खरेदीला मान्यता मिळाली आहे. मात्र, येथील प्रयोगशाळेतील एका वरिष्ठाने विशिष्ट कंपनीचेच मशिन घ्यावे, असा आग्रह धरल्याने खरेदी लांबणीवर पडत आहे. अशात कोरोना बाधितांची संख्या वाढल्यास स्वॅब तपासणीचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

kolhapur
कोल्हापूर : कलात्मक घड्याळांतून जपले फुटबॉलप्रेम

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढणार असल्याची माहिती केंद्र व राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केली. तसेच, कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहण्याचा सल्लाही दिला. अशा स्थितीत जिल्हा प्रयोगशाळेकडे दोन मशिनवर सध्या स्वॅब चाचणी होते. ही यंत्रणा अपुरी पडल्यास अनेकांना स्वॅब तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेकडे जावे लागेल. यातून शासनाचे व रुग्णांचेही नुकसान होण्याचा धोका आहे.

kolhapur
आदित्य ठाकरेंनी जपले नाशिककरांचे निसर्गप्रेम व अध्यात्मिक आस्था!

पंधरा दिवसांपूर्वी वैद्यकीय प्रशासनाकडून तिसरे स्वॅब तपासणी मशिन खरेदी करण्यासाठी खर्चाची मान्यता मिळाली. त्यानुसार निविदा प्रक्रिया सुरू झाली. मात्र, मशिनची मागणी प्रयोगशाळेच्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना करावी लागते. येथील अधिकाऱ्यांनी विशिष्ठ कंपनीचे मशिनच घ्यावे, असा आग्रह धरला. त्यांनी सुचविलेले मशिन सध्या कोल्हापुरातील एकाच पुरवठादाराकडे आहे. त्यालाच हा लाभ मिळावा यासाठी असा प्रयत्न होतोय की काय अशी शंका व्यक्त होत आहे.

राज्यातील अन्य प्रयोगशाळात मुंबईतील हाप्किन्स इन्स्टिट्यूटकडून आलेली मशिन यापूर्वीच बसवली आहेत. त्याच प्रकारचे मशिन येथेही बसवले जाणार होते. मात्र, या अधिकाऱ्यांनी ठरावीक कंपनीच्या मशिनचा आग्रह धरला आहे. त्यामुळे निविदा निघून आठ दिवस झाले तरी प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होत आहे.

kolhapur
लग्नाची गोष्ट : ‘कलात्मक’ लग्नाची ‘सोशल’ गोष्ट!

अशा स्थितीत कोरोना बाधितांची संख्या वाढल्यास पर्याय काय असा प्रश्‍न आहे. प्रयोगशाळेतील गरजेनुसार हे वरिष्ठ अधिकारी ठरावीक मशिनची मागणी करू शकतात. त्यानुसार पुरवठा करावा लागतो अशीही यात प्रयोगशाळेच्या वरिष्ठांची बाजू आहे.

सीबीनेट मशिन प्रयोगशाळेत बसवण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अजूनही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अंतिम निर्णय झालेला नाही.

- डॉ. अनिल माळी, जिल्हा शल्यचिकित्सक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com