esakal | योजना शंभर टक्के राबवा, देश आत्मनिर्भर बनेल - राज्यपाल कोश्यारी
sakal

बोलून बातमी शोधा

Governor Bhagat Singh Koshari

योजना शंभर टक्के राबवा, देश आत्मनिर्भर बनेल - राज्यपाल कोश्यारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली: केंद्र व राज्याच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा. शंभर टक्के अंमलबजावणी करा. लोक ताकदीने उभे राहतील. पंतप्रधानांना अपेक्षीत असलेला भारत आत्मनिर्भर बनेल. जगात देश पहिल्या क्रमांकावर येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज येथे व्यक्त केले. पूरग्रस्तांनो खचू नका, मी ही अशी संकटे येणाऱ्या भागातील असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: 'पंधराव्या वित्त आयोगातून राज्यासाठी 1292 कोटी'

केंद्रीय मंत्री कपिल पाटील, जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष दौलत शितोळे, अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद उपस्थित होत्या. त्यांच्या ट्रस्ट्रतर्फे जिल्ह्यातील पाच मुलींना राज्यपालांच्या हस्ते पावत्या वितरीत करण्यात आल्या.

त्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल राज्यपालांच्याहस्ते अभिनेत्री दीपाली यांनाही गौरवण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधिक्षक दिक्षीत गेडाम, राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, संजय बजाज, छाया पाटील आदि उपस्थित होते.

कोश्यारी म्हणाले,‘‘सांगलीत यायची इच्छा होती. अभिनेत्री दीपाली यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे येथे आलो. आपत्तीत निसर्ग सर्वांचीच परीक्षा घेतो. सर्वांनी धैर्य राखून एकमेकाला मदतीचा हात दिला पाहिजे. भारतात सामाजिक कार्याची परंपरा प्राचिन आहे. त्याच परंपरेशी नाते सांगणारे दीपाली यांच्या ट्रस्टमार्फत होत असलेले कार्य पुण्याचे आहे.

हेही वाचा: कोल्हापूर स्पोर्ट्सचा तारा निखळला; सरदार मोमीन यांचे निधन

पैसे अनेकजण मिळवतात. मात्र उपयोग सत्कार्यासाठी करणे महत्वाचे आहे. पुरग्रस्तांना उभारी देण्यात ट्रस्टने वाटा उचलला. असाच प्रत्येकाने उचलावा. अशा कार्याचा गौरव शासन पातळीवरही झाल्यास आणखी लोक मदतीसाठी पुढे येतील. राजकारणात पराभूत झाल्यानंतर लोक थांबतात, मात्र दीपाली यांनी चांगले काम सुरु ठेवलेय. त्या अशाच काम करत राहिल्या तर राजकारणताही यशस्वी होतील.’’

केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले,‘‘पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पाऊस, महापुरामुळे संकट आले. अतिवृष्टी, महापुराने शेकडो घरे उद्ध्वस्त झाली. घरं पडलेल्यांना ९५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यातून घर बांधणे शक्य नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवासमध्ये पूरग्रस्तांना प्राधान्य देण्याची मागणी आहे. मात्र राज्यात लाभार्थींची यादी मंजुरीविना पडली आहे. तत्काळ मंजुरीसाठी प्रयत्न केला जाईल. अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी केवळ स्क्रीनवर अ‍ॅक्टींग न करता समाजासाठी जगणारे म्हणून नाव मिळवले. त्यांच्यानंतर दीपाली यांचे नाव घ्यावे लागेल.’’

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले,‘‘कृष्णा, वारणा काठावरील अनेकांचे आयुष्य अंधारात गेले. मंत्री येतात, आश्वासन देतातय. परंतू पाणी ओसरल्यानंतर काय स्थिती होते. हे भयावह आहे.’’ मंत्री पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघात किल्लेमछिंद्रगड येथे मच्छिंद्रनाथ मठ आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून विकास केला जात आहे. मच्छिंद्रगड येथे जानेवारीत कोविड साथ कमी झाल्यानंतर राज्यपालांनी पुन्हा यावे.’’ त्याला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

खासदार संजय पाटील म्हणाले,‘‘सामाजिक काम करुन छाप पाडणाऱ्या अभिनेत्यांना मतदार स्वीकारतात. धर्मेंद्र, हेमामालिनी, सनी देओल त्यात आहेत.’’ दीपाली सय्यद यांना पूरपट्टयात निवडणूक लढवायची नाही. तरीही मदतीचे मोठे काम त्या करीत आहेत. पण काळजी करु नका, असे शिवसेनेचे खासदार माने यांच्याकडे पाहत सांगितले. त्यामुळे हशा पिकला. माने यांनी दीपाली राजकारणात आल्या तर स्वागत करु, असे सांगत दाद दिली. माने यांनी ट्रस्टचे कौतुक केले.

पूरग्रस्तांना बळ देण्याचे काम केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राज्यात यापूर्वी अनेक राज्यपाल आले गेले. ते लोकांच्या लक्षात राहिले नाहीत. राज्यपाल कोश्यारी मात्र फेमस बनलेत. तुमच्याकडे विरोधक आणि सत्ताधारीही सातत्याने येतात. त्यामुळेच राज्यपालांची ओळख प्रत्येक नागरिकाला झाल्याचे खासदार माने यांनी म्हटल्यानंतर उपस्थितांनी दाद दिली.

हजार मुलींची आई बनले : दीपाली

अभिनेत्री दीपाली सय्यद-भोसले म्हणाल्या,‘‘सन २०१९ मधील महापुराची पाहणी केल्यानंतर अश्रू आवरता आले नाहीत. तेंव्हाच पूरग्रस्तांसाठी काहीतरी केले पाहिजे असे ठरवले. पूरग्रस्त एक हजार मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याचा मनोदय आज पूर्ण झाला. त्यामुळे मी आता एक हजार मुलींची आई बनल्याचे उद्‍गार त्यांनी काढले. सन १९९८ मध्ये सामाजिक कार्याला सुरुवात केली. छोटे लावलेले रोपटे मोठे होईल, असे वाटले नव्हते.

loading image
go to top