कोल्हापूर : मेंदू, अस्थी उपचार खर्चात वाढ द्या; रुग्णालयांची मागणी

महात्मा फुले जनआरोग्यमधील रुग्णालयांची मागणी; मेंदू उपचारांसाठी बेळगाव गाठण्याची वेळ
 

Increase cost of brain bone healing Demand of hospitals kolhapur
Increase cost of brain bone healing Demand of hospitals kolhapur sakal

कोल्हापूर : राज्य शासनाने सुरू केलेली महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी वरदान ठरली आहे. उपचारांसाठी खासगी रुग्णालयांना देण्यात येणाऱ्या बिलांची रक्कम समाधानकारक आहे. मात्र, अस्थिरोग, मेंदू रोगाच्या उपचारांसाठी योजनेतून रुग्णालयांना मिळणारा खर्च अत्यल्प आहे. गंभीर रुग्णांवर शस्त्रक्रिया कमी खर्चात कराव्यात कशा? असा प्रश्न योजनेतील खासगी डॉक्टरांना पडतो. असा खर्च वाढवून मिळावा, अशी अपेक्षा डॉक्टर व्यक्त करीत आहेत.

योजनेतून कमी रक्कम मिळत असल्याने यातून काही वेळा रुग्णांकडून पैसे घ्यावे लागतात, तर काही वेळा योजनेतून लाभ देणे अवघड होते. मेंदू विकारातील काही रुग्णांना उपचारासाठी बेळगावच्या ‘केईएल’कडे उपचारासाठी जावे लागते. योजनेतून रुग्णालयाला देण्यात येणाऱ्या खर्चात वाढ करावी, अशी अपेक्षा योजना चालविणाऱ्या रुग्णालयाकडून होत आहे. गंभीर आजारी किंवा जखमींवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ११०० आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया होतात. यात जिल्ह्यातील १२ शासकीय, ३१ खासगी रुग्णालयात ही योजना आहे. दरवर्षी दीड लाख रुग्ण उपचार घेतात.

खासगी रुग्णालयात रुग्णाचा आजार योजनेत बसत असेल तर तातडीने उपचार होतात. चार दिवस ते महिन्याभरात रुग्णावर उपचार व गरजेनुसार शस्त्रक्रिया होते. योजना समितीतर्फे उपचाराचा सर्व खर्च संबंधित रुग्णालयाला दिला जातो. मात्र, नियमित मेंदू विकारांसाठी योजनेतून संबंधित रुग्णालयाला ३० ते ४० हजार रुपये दिले जातात. काही वेळा मेंदू होणाऱ्या गाठी काढण्यासाठी न्यूरोस्कोपीचा वापर केला जातो. या पध्दतीचा वापर करावा लागेल अशा मेंदू विकारग्रस्तांची संख्या जास्त आहे. त्यासाठी ५० हजार ते एक लाख रुपये योजनेतून संबंधित रुग्णालयाला देण्यात येतात; मात्र प्रत्यक्ष अशा उपचारासाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. तेवढा खर्च योजनेतून मिळत नसल्याने काही मेंदू विकारतज्ज्ञांनी योजनेत उपचार देणे थांबवले आहे. अशीच स्थिती अस्थी रोगतज्ज्ञांची आहे. योजनेतून हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी २० हजार रुपये मिळतात. मात्र, उपचाराचा खर्च त्यापेक्षा जास्त येतो. काही वेळा विशिष्ट प्रकारच्या क्लिप, रॉड हे दहा ते पंधरा हजारांना घ्यावे लागतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com