बँक निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार; राज्यमंत्र्यांची उद्या घोषणा l Bank Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

बँक निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार; राज्यमंत्र्यांची उद्या घोषणा

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या (Bank Election) निवडणुकीत दिवसभराच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर शिवसेनेने (Shivsena) मागणी केलेल्या तीन जागांचा प्रस्ताव सत्तारूढ गटाने अमान्य केल्याने या निवडणुकीत सर्वच जागांवर शिवसेनेचे स्वतंत्र पॅनेल उभा करण्याचा इशारा रात्री उशारी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, (Rajendra Patil-Yadravkar) सेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर(Arun Dudhwadkar) व खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी पत्रकार परिषदेत दिला. उद्या (ता. २१) दुपारी बारा वाजता पॅनेलची घोषणा करण्‍यात येईल, अशी माहिती या सर्वांनी दिली. या निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडल्याचे निश्‍चित झाले.

राज्यातील महाविकास आघाडीचा फार्म्युला जिल्हा बँकेतेही वापरण्यात येणार असल्याची घोषणा सत्तारूढ गटाचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. त्यादृष्टीने सेनेच्या स्थानिक तसेच वरिष्ठ नेत्यांशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. यातून विद्यमान संचालकांपैकी प्रा. मंडलिक व माजी खासदार श्रीमती निवेदीता माने यांना शिवसेनेचे म्हणून उमेदवारी निश्‍चित झाली होती. तथापि गेल्या आठवड्यात दुधवडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात जास्तीत जास्त जागा देण्याची मागणी शिवसेनेने केली. त्यानंतर पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी या निवडणुकीत शिवसेनेला किमान पाच जागा मिळाव्यात असा प्रस्ताव प्रा. मंडलिक यांना कळवला होता.

हेही वाचा: ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी काळाच्या पडद्याआड

आज शिवसेनेला जागा देण्याबाबत सकाळपासून शासकीय विश्रामगृहावर चर्चेचे गुऱ्हाळ दिवसभर सुरू होते. यात शिवसेनेकडून राखीव गटातील किमान तीन जागांची मागणी करण्यात आली. यात मंडलिक, श्रीमती माने यांची उमेदवारी कायम ठेवून अन्य एका गटातील एक जागा मिळावी असा प्रस्ताव दुधवडकर यांनी ठेवला. यावर दुधवडकर यांच्याशी पालकमंत्री सतेज पाटील, मुश्रीफ यांच्यासह इतर नेत्यांनी चर्चा केली.

Web Title: Independent Panel Of Shiv Sena In District Bank Kolhapur Marathi Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top