मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल करा; चंद्रकांत पाटलांची सूचना

मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल करा; चंद्रकांत पाटलांची सूचना

कोल्हापूर : मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने पहिल्यांदा पुनर्विचार याचिका दाखल केली पाहीजे. एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचा राज्याचा अधिकार १०२ व्या घटना दुरुस्तीनंतरही आहे. हे सर्वोच्च न्यायालयातून(Supreme Court)पदरात पाडून घ्यावे. यासाठी उच्च न्यायालयाचा निकाल, लोकसभेच्या संयुक्त समितीचा अहवाल याचा संदर्भ द्यावा. त्यानंतर तातडीने मागास आयोगाची नव्याने स्थापना करून मराठा समाज (maratha reservation)कसा मागास आहे. हे पुन्हा सिद्ध केले पाहिजे. या गोष्टी प्राधान्याने सरकारने करणे आवश्यक आहे. मात्र अद्याप यावर फारसे काही होताना दिसत नाही. अशी टिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil)यांनी केली.

janata party state president chandrakant patil criticism mahavikas aghadi kolhapur political marathi news

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ॲक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षण आणि राज्य सरकारचे प्रयत्न यावर ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे नेते भाजपवर आरोप करून मराठा समाजाची दिशा भूल करत आहेत. आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. मात्र जे करणे अपेक्षित आहे ते सरकार करत नाही.

अत्तापर्यंत राज्य सरकारने पुर्नविचार याचिका दाखल करायला हवी होती. राज्यात मागास आयोगाची स्थापना करून पुन्हा एकदा मराठा कसा मागास आहे हे सिद्ध केले पाहीजे. मात्र यातील एकही गोष्ट सरकार करत नाही. केवळ भाजपवर आरोप करून दिशाभूल करण्याचे काम करत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल चिक्कोडे, नगरसेवक अजित ठाणेकर, सरचिटणीस हेमंत अराध्ये, दिलीप मैत्राणी,अशोक देसाई, विजय जाधव, शंतनू मोहिते, अक्षय निरोखेकर,पृथ्वीराज जाधव, महेश मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

ते घरी पाणी भरा म्हणतील

मंत्री छगन भुजबळ यांची माफी मागा अशी मागणी ग्रामविकास मंत्री यांनी केली होती यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,‘लोकशाहीत कोणालाही कोणतीही मागणी करण्याचा अधिकार आहे. चंद्रकांत पाटील यांनी माझ्या घरी पाणी भरावे असेही मुश्रीफ म्हणतील.

अजित पवारांनी ९ महिने काय केले

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विलिनिकरणाबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित पवारांनी आता महामंडळ नियोजन मंडळाच्या अखत्यारीत घेतले आहे. मग गेले ९ महिने ते काय करत होते. त्यावेळी का घेतले नाही.

janata party state president chandrakant patil criticism mahavikas aghadi kolhapur political marathi news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com