
कोल्हापूर : भाजयुमोतर्फे जोडे-मारो आंदोलन
कोल्हापूर : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खासगी आयुष्यावर आक्षेपार्ह विधान करून त्या पदाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे-पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली पटोले यांच्या प्रतिमेला जोडे-मारो आंदोलन केले.
हेही वाचा: स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली तरी आपण जातव्यवस्थेच्या कचाट्यातच: हायकोर्ट
युवा मोर्चातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तर महिला मोर्चातर्फे बिंदू चौकात स्वतंत्र कार्यक्रम घेत निषेध नोंदवला. ‘नाना पटोले कोण रे, त्याला जोडे मारा दोन रे,’ अशा घोषणा केल्या. खाडे-पाटील म्हणाले, ‘नगरपंचायत निवडणुकीत भाजप प्रथम क्रमांकावर राहिली. राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर गेल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्वतःचे अपयश लपवण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी आयुष्यावर आक्षेपार्ह विधान करून खोटी प्रसिद्धी मिळविण्याचा, पार्टी हायकमांडचा विश्वास मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पटोले यांना पोलिस अटक करत नाही. कॉंग्रेस पार्टीचे हायकमांड त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करत नाहीत, तोपर्यंत युवा मोर्चातर्फे आंदोलने सुरूच राहतील.’
हेही वाचा: राजकारणात तू कधी उतरणार? बहिणीसाठी काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या सोनू सूदने दिलं उत्तर
सरचिटणीस हेमंत आराध्ये म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्यापेक्षा मागील सव्वादोन वर्षे बाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांना बंगल्याबाहेर पडावे. यासाठी त्यांनी आंदोलन करावे.’ युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस विवेक वोरा, राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मैत्राणी, पक्ष प्रवक्ते अजित ठाणेकर, भरत काळे, प्रदीप उलपे, चंद्रकांत गाडगे, विराज चिखलीकर, गिरीश साळोखे, सुनील पाटील, रोहित कारंडे, प्रसाद घाटगे, अनिकेत मुतगी, प्रसाद पाटोळे, सुषमा गर्दे, भारती जोशी, सुलभा मुजुमदार, आसावरी जुगदार आदी उपस्थित होते.
हेही वाचा: Young weather champion : प्राजक्ता कोळी साधणार तरुणांशी संवाद
पटोलेंविरोधात कागलला जोरदार घोषणाबाजी
कागल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कागल तालुका भाजपच्यावतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पटोलेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वारंवार आक्षेपार्ह विधान करणाऱ्या पटोले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे अशी जोरदार टीका भाजपचे प्रताप पाटील, राजेंद्र जाधव यांनी केली. यावेळी संजय पाटील बेळवडेकर, प्रताप पाटील, सुनील मगदूम, आसिफ मुल्ला, राजेंद्र जाधव, सतीश पाटील, दिलीप घाटगे, बाळासाहेब जाधव, एम. ए. मदारे, शिवगोंड पाटील, स्वप्निल शिंगाडे, संजय घाटगे, उमेश सावंत, महेश माने, वैभव गोरडे आदी उपस्थित होते.
Web Title: Jode Maro Movement By Bjp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..