esakal | 'या' सासन काठीची नोंद देवस्थान समितीच्या दप्तरी; मिळाले दुसरे मानाचे स्थान

बोलून बातमी शोधा

'या' सासन काठीची नोंद देवस्थान समितीच्या दप्तरी;  मिळाले दुसरे मानाचे स्थान
'या' सासन काठीची नोंद देवस्थान समितीच्या दप्तरी; मिळाले दुसरे मानाचे स्थान
sakal_logo
By
निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : कराड पासून २० किलो मीटर अंतरावर व कोयना नदीच्या काठावर वसलेले गाव म्हणजे विहे ता. पाटण जि. सातारा . जोतिबा चैत्र यात्रेत या सासनकाठीला दुसरा मान असून याकाठीची उंची ४०फुट असून पोशाख लाल पांढरा अशा रंगाचा असतो. या सासन काठीची नोंद देवस्थान समितीच्या दप्तरी असून पूर्वीचे मानकरी म्हणून जोति रावजी पाटील, बाबाजी जोति पाटील , आनंदा बाबाजी पाटील, बबन आनंदा पाटील यांची नोंद आढळते. या गावचे वैशिष्टये म्हणजे गुढीपाडव्यापासून महिना भर पूर्ण गाव शाकाहरी असते. रविवारी व पौर्णिमा या दिवशी गावात मांसाहर केला जात नाही.

चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी सासनकाठी ग्रामदैवत श्री. भैरवनाथ व श्री. केदार नाथ मंदिरासमोर उभी केली जाते. काठीचे विधीवत पुजन करुन आरती कली जाते व त्या दिवशी दुपारी तीन वाजता पंचाग वाचन व लिंब खाणे हा कार्यक्रम होतो. त्यानंतर काठी प्रस्थानविषयी चर्चा होते.जोतिबा डोंगरावर पायी जाण्याविषयी मार्गदर्शन केले जाते व सर्व नियोजन करण्यात येते.त्यानंतर एकादशीला दुपारी तीन वाजता सासनकाठी जोतिबा देवस्थान वाडी रत्नागिरीकडे( जोतिबा डोंगर ) प्रस्थान होते. सासन काठी विहे गावातून तांबवे फाटा मार्गे किरपे गावातून मांड नदी येते. सांयकाळी आरती करून काले( ता. कराड )गावांमध्ये मुक्काम केला जातो.

दुसऱ्या दिवशी पहाटे उठून काळमवाडीच्या विहिरीवरती आरती होते. पुढे , माणिक वाडीच्या जोगेश्वरी मंदिरामध्ये विश्रांती घेऊन तेथून काठीचे प्रस्थान होते. कोडे खिंडीमध्ये सासनकाठीचा उभा छबीना निघून देवाच्या पादुका जवळ आरती केली जाते. नंतर कोडे खिंड उतरून काठी पायी करंजवडे येथील मारुती मंदिरामध्ये जाते. तिथून पुढे पायी मार्गक्रमण करत वारणा नदी वरती श्रींची आरती केली जाते व बहिरेवाडी ता. पन्हाळा येथे मुक्कामास प्रस्थान होते. दुसऱ्या दिवशी पहाटे जोतिबा डोंगराकडे प्रस्थान होते.

डोंगराकडे प्रस्थान केल्यानंतर डोंगराच्या पायथ्याला श्रींच्या पादुका जवळ आरती केली जाते व डोंगर चढून यमाईदेवी मंदिराच्या जवळ सासनकाठी चे आगमन होते . दुपारी चार वाजता यमाई मंदिरा जवळ देवस्थान कमिटीचे भालदार-चोपदार सासनकाठीला भेट देऊन मानाचा नारळ व पानविडा देतात.

नंतर काठी केदारनाथाच्या भेटीला उभा छबिना घेऊन निघते केदारनाथ देवालयाला प्रदक्षिना घालून काळभैरवनाथाच्या देवा समोरील दीप माळेला उभी केली जाते . श्रींच्या पालखी चा छबिना पूर्ण झाल्यानंतर तोफेची सलामी होते . डोंगरावरील चैत्र यात्रेचा मुख्य दिवसाचा छबिना झाल्यावर काठी परतीच्या प्रवासाला लागते. त्यानंतर वारणा नदीवर येऊन नारळ अर्पण केला जातो व श्रींची आरती होते व पायी प्रवासाला सुरुवात होते. रात्रभर प्रवास करून सकाळी सूर्योदयापूर्वी काळमवाडी येथे आगमन होते.

विंग गावातून आरेवाडी येथील भैरवनाथाच्या बागेमधील मंदिरामध्ये विसावते व तेथे भैरवनाथाचा भंडारा केला जातो आरती करून नैवेद्य दाखवला जातो.व विहे गावाकडे प्रस्थान होते त्या दिवशी विहे गावामध्ये भर यात्रा असते. गावामध्ये सहा वाजता आगमन झाल्यानंतर गावातील सुवासिनी व गावकरी आरती ओवाळून स्वागत करतात व श्री ' ना आंबीलाचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप केला जातो त्यानंतर सासनकाठीची शेडगेवाडी विहे गावातून मिरवणूक थेट श्री ज्योतिर्लिंग देवालया समोर येऊन थांबली जाते. सांयकाळी श्रींची आरती होते. व पालखी छबिना निघतो तो रात्री दोन अडीच पर्यंत चालतो.

Edited By- Archana Banage