ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी काळाच्या पडद्याआड

कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ‘(किफ) सुरु करण्यात पुढाकार.
Chandrakant Joshi
Chandrakant JoshiEsakal

कोल्हापूर : येथील ज्येष्ठ दिग्दर्शक व कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत दत्तात्रय जोशी (Chandrakant Joshi) (वय ७९) यांचे आज निधन झाले. काल प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले होते. आज सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी त्यांचा ब्रेन डेड झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी जाहीर केले. उद्या (मंगळवारी) सकाळी साडेनऊ वाजता अंबाबाई मंदिर परिसरातील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. दरम्यान, त्यांच्या मागे अभिनेता हृषीकेश जोशी, पत्रकार गोपाळ जोशी, अनिरूध्द जोशी या तीन मुलांसह मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

पस्तीस वर्षे येथील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या न्यू हायस्कूल शाळेत कलाशिक्षक म्हणून काम करत असतानाच त्यांनी अनेक नाट्य आणि सिनेक्षेत्रात विविध प्रयोग केले. निवृत्तीनंतर पूर्ण वेळ ते याच क्षेत्रात कार्यरत होते. कोल्हापुरात कला महोत्सवाची परंपरा त्यांच्याच पुढाकाराने सुरू झाली. शिवाजी विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे समन्वयक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी फिल्म सोसायटी चळवळ उभी केली. अभिनयाबरोबरच कलादिग्दर्शन आणि दिग्दर्शक म्हणून चाळीस वर्षाहून अधिक काळ ते कार्यरत होते. नाना पाटेकर, स्मिता पाटील, गिरीश कर्नाड यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘सूत्रधार' या हिंदी सिनेमाबरोबरच ‘जगज्जननी श्री महालक्ष्मी‘ या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन त्यांनी केले.

श्रीराम लागू, निळू फुले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘टक्कर' त्याचबरोबर ‘निर्मला मछिंद्र कांबळी‘ या मराठी सिनेमांची निर्मिती व दिग्दर्शनही त्यांनी केले. ‘लोकराजा शाहू छत्रपती‘ या मालिकेसाठी त्यांनी कला व वेशभूषाकार म्हणून काम पाहिले. ‘जीवन संध्या‘ आणि ‘दृष्ट' या मालिकेत त्यांनी भूमिकाही केल्या. ‘जीवन संध्या‘ मालिकेतील भूमिकेसाठी त्यांना विविध पुरस्कार मिळाले होते. चित्रपट व नाट्यविषयक विपुल लेखनही त्यांनी केले.

Chandrakant Joshi
कागलचा शाहू कारखाना बिनविरोध; समरजितसिंह घाटगेंचे वर्चस्व कायम

जगाच्या नकाशावर कोल्हापूर

कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ‘किफ' सुरू करण्यात त्यांचा पुढाकार महत्वाचा होता. ‘किफ'च्या माध्यमातून जगाच्या नकाशावर कोल्हापूरचे नाव त्यांनी अधिक ठळक केले. कोरोनानंतर यंदाच्या ‘किफ'च्या नियोजनात ते सध्या व्यस्त होते. लॉकडाऊननंतरचा पहिलाच सुमित्रा भावे स्मृती महोत्सव नुकताच झाला. त्याच्या उद्घाटन समारंभालाही ते उपस्थित होते. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com