Sanjay Raut : 'फडणवीसांनी भगव्याचा पराभव करण्यासाठी सभा घेतली, तर जनता कधीच माफ करणार नाही'

भाजपचे हिंदुत्व बेगडे असून येथील मराठी भाषिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय केले जात आहेत.
Sanjay Raut,Devendra Fadnavis and Eknath Shinde
Sanjay Raut,Devendra Fadnavis and Eknath ShindeSakal
Summary

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भगव्याचा पराभव करण्यासाठी सीमाभागात सभा घेऊ नये. जर सभा घेतली तर मराठी भाषिक जनता त्यांना माफ करणार नाही.

बेळगाव : भाजपचे (BJP) हिंदुत्व ढोंगी आहे. शिवसेना नसती, तर राम मंदिर निर्माण झाले नसते. सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव करण्यासाठी प्रचाराला येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.

बेळगाव दक्षिण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे (Maharashtra Ekikaran Samiti) उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ कारभार गल्ली, वडगाव येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. खासदार राऊत म्हणाले, ‘‘आजची सभा ही समितीच्या विजयाची सुरुवात आहे. भाजपचे हिंदुत्व बेगडे असून येथील मराठी भाषिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय केले जात आहेत. मात्र, १० मे रोजी जनता समितीचा विजय निश्चित करणार आहे. समितीचा उमेदवार हाच शिवसेनेचा उमेदवार आहे.’’

Sanjay Raut,Devendra Fadnavis and Eknath Shinde
Bazar Samiti Election : 'शेतकऱ्यांसाठी विरोधात लढलो, पण 'या' चार आमदारांमुळं माझा पराभव झाला'

सीमाभागात प्रचारासाठी येणाऱ्या भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करावे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भगव्याचा पराभव करण्यासाठी सीमाभागात सभा घेऊ नये. जर सभा घेतली तर मराठी भाषिक जनता त्यांना माफ करणार नाही.

Sanjay Raut,Devendra Fadnavis and Eknath Shinde
Karnataka Election : 'बजरंगबली की जय'च्या घोषणेनं मोदींची भाषणाला सुरुवात; म्हणाले, 'यांच्या'पासून सावध राहा

रमाकांत कोंडुसकर यांनी, समितीची शक्ती बघून विरोधकांनी फिरायचे बंद केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खरे हिंदुत्ववादी असतील, तर त्यांनी ढोंग करणाऱ्यांच्या प्रचाराला येऊ नये, असा इशारा दिला. व्यासपीठावर कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, दिनेश ओऊळकर आदी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com