esakal | महापालिकेतील घोटाळ्याची लोकायुक्तांकडे तक्रार करा; किरीट सोमय्या
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेतील घोटाळ्याची लोकायुक्तांकडे तक्रार करा; किरीट सोमय्या

महापालिकेतील घोटाळ्याची लोकायुक्तांकडे तक्रार करा; किरीट सोमय्या

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : महापालिकेत आजवर झालेल्या विविध प्रकारच्या १४ घोटाळ्यांची यादीच आज भाजपचे माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांना सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे आणि सतीश साखळकर यांनी सादर केली. अलीकडच्या विज बिल, जीएसटीसह विशेष लेखापरीक्षण, बीओटी, जपानी बँक कर्ज आदी घोटाळ्यांचा यात समावेश आहे.

राज्यातील विद्यमान मंत्री आमदारांच्या घोटाळे बाहेर काढून खळबळ उडवून देणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आज सांगलीत आले होते. त्यावेळी महापालिकेच्या विविध घोटाळ्यावर आवाज उठवून पाठपुरावा करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बर्वे तसेच नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी त्यांची भेट घेतली.

महापालिकेच्या स्थापनेपासून आजवर झालेल्या १४ घोटाळ्याबाबत सोमय्या यांना माहिती दिली. सुमारे बाराशे कोटींचे हे घोटाळे आहेत. याबाबत आवाज उठवण्याची गरज व्यक्त केली. किरीट सोमय्या यांनी याबाबत घोटाळ्यांची माहीती लोकायुक्तांना तसेच नगरविकास विभागाच्या सचिवांना देऊन त्यांच्याकडे तक्रार करावी असा सल्ला दिला. त्यानंतर याचा पाठपुरावा करू असे ते म्हणाले.

मनपा विज बिल घोटाळा, सन १९९८ ते २०१५ अखेरचे विशेष लेखा परीक्षण, कै.वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील महापालिकेची बुडीत रक्कम, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमधील घोटाळा, ई-गव्हर्नन्स (H.C.L) घोटाळा, घनकचरा प्रकल्प घोटाळा, बोगस सर्वे रिपोर्ट्स घोटाळा, औषध खरेदी घोटाळा, जपानी बँक कर्ज घोटाळा, माळ बंगला जमीन खरेदी घोटाळा, ठेकेदारांचा जी.एस.टी घोटाळा, समुद्रा कंपनीला दिलेला एल.ई.डी दिव्या बाबतचा विनानिविदा ठेका, बी.ओ.टी घोटाळा, ड्रेनेज योजना घोटाळा ही यादी सोमय्या यांना देण्यात आली.लोकायुक्त व नगर विकास यांचेकडे परत एकदा तक्रार दाखल करा. यासाठी लागणारी सर्व ती मदत करण्यास मी तयार आहे. आपण सर्वजण मिळुन सदर विषय तडीस नेऊ, असे सोमय्या म्हणाल्याचे बर्वे व साखळकर यांनी सांगितले.

loading image
go to top