कोल्हापूर : बेदाणा तारणासाठी पहिल्‍या टप्प्यात १० कोटी

बँकेद्वारे योजना राबविणारी तासगाव पहिली बाजार समिती
 Sangli Bedana Deal
Sangli Bedana Dealsakal

तासगाव: तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बँक ऑफ इंडियाच्या विद्यमाने तासगाव तालुक्यात बेदाणा तारण योजना सुरू करण्यात आली आहे. बँकेच्या माध्यमातून शेतमाल तारण योजना राबविणारी तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पहिली ठरली आहे. पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन २००६ पासून कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून अशा प्रकारे पहिल्यांदा बेदाण्यासाठी सहा टक्के व्याज दराने कृषी माल तारण योजना सुरू केली होती. सन २००६ ते २०१३ पर्यत १६ कोटींची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली होती. ही योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल १० लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते. हे अनुदानही शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर आता बँक ऑफ इंडियाने पुढाकार घेतला आहे. बँकेच्या माध्यमातून व बाजार समितीच्या वसुलीहमीवर कोल्ड स्टोअरेज मध्ये ठेवलेल्या बेदाण्यावर माल तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेल्या बेदाण्याच्या रिसीटवर ३ लाखापर्यंत पावणे ८.७५ टक्के दराने, तीन लाखावर ९.०५ टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका शेतकऱ्यास ९ लाखापर्यंत त्यातून कर्ज उपलब्ध होईल. स्टोअरेज चालकांना बाजारसमिती बरोबर करार करावा लागेल. सध्या शेतकऱ्यांना बेदाणा तारण साठी १३ ते १६ टक्के व्याजाने बँका आकारणी करतात. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांना फायद्याची ठरणार आहे.

आज बँक ऑफ इंडिया वबाजार समिती यांच्यात करार झाला बाजार समिती सभापती नवनाथ मस्के, बँक ऑफ इंडियाचे असिस्टंट जनरल मॅनेजर आर. पी. कुलकर्णी यांनी करारावर सह्या केल्या. अग्रणी जिल्हा प्रबंधक महेश हर्णे, प्रबंधक संदीप पाटील, सौरभ देशमुख, बँक व्यवस्थापक हिमांशू भारद्वाज, त्रिशूल देसाई, माजी सभापती रवींद्र पाटील, अजित जाधव, संचालक कुमार शेटे, सचिव चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक सचिव चंद्रकांत कणसे, नौशाद मोमीन, ओंकार सूर्यवंशी

उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com