kolhapur municipal corporation
kolhapur municipal corporationsakal

कोल्हापूर : वेतनाच्या प्रतीक्षेत ४२ डॉक्टर

वर्षभरात अनेकदा वेतन थकीत राहिले

कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयात काम करणाऱ्या ३८ वैद्यकीय अधिकारी व तसेच हृदय शस्त्रक्रिया विभागातील चार डॉक्टरांना गेले तीन महिने वेतन मिळालेले नाही. वर्षभरात अनेकदा वेतन थकीत राहिले, तसेच राज्यभरातील अन्य जिल्ह्यांतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत दिले जाते; मात्र कोल्हापुरातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून निधी मागण्यात उणिवा राहिल्या. त्यातून हे वेतन मिळण्यास विलंब होत आहे, याबद्दल डॉक्टरांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक याबरोबर वैद्यकीय अधिकारी अशी पदे आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून येणाऱ्या निधीतून सर्वांचे वेतन वेळीच दिले जाते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र निधी मागणी करावी लागते. त्यासाठी एक कोटी ८० लाखांच्या निधीची मागणी करावी लागणार होती. असे असताना संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून केवळ ५० लाख निधीची मागणी केली. त्यानुसार निधी आला. त्यातून मोजक्या २२ डॉक्टरांचे पूर्वीचे थकीत वेतन झाले; मात्र मे, जून व जुलैचे ४२ डॉक्टरांना वेतन मिळालेले नाही.

यापूर्वीही असाच प्रकार तीन वेळा घडला होता. प्रत्येक वेळी तांत्रिक त्रुटी दाखवून वेतन देण्यास विलंब होतो. याबद्दल डॉक्टरांकडून नाराजी व्यक्त होत आहे. हृदय शस्त्रक्रिया विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांना पूर्वीपासून वेतन थकीत राहण्याचा फटका सोसावा लागत आहे. कोरोना काळातही या विभागाच्या सर्वच डॉक्टरांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, तरीही त्यांना वेतन थकीत राहिले होते. आता पुन्हा याच विभागातील डॉक्टरांचे वेतन थकीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com