कोल्‍हापुरात तणाव वाढतच राजू शेट्टींची प्रतिक्रिया आली समोर; म्हणाले, भावनेच्या आहारी जावून.. I Kolhapur Bandh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Bandh Raju Shetti

कोल्‍हापूर ही शाहू महाराज यांची पुरोगामी नगरी आहे. इथं दोन समाजात तेढ निर्माण होणं दुर्दैवी आहे.

Kolhapur Bandh : कोल्‍हापुरात तणाव वाढतच राजू शेट्टींची प्रतिक्रिया आली समोर; म्हणाले, भावनेच्या आहारी जावून..

Kolhapur Bandh : औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस् ठेवल्यानं आणि काही लोकांनी हे स्टेटस् सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं कोल्हापूर शहरात मंगळवारी संतप्त पडसाद उमटले. आजही सकाळपासून काही परिसरात प्रचंड तणाव आहे.

दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोल्‍हापुरातील तरुणांनी भावनेच्‍या आहारी जावू नये, सर्वांनी शांतता राखावी, असं त्यांनी आवाहन केलं आहे.

कोल्‍हापुरातील तणावपूर्ण परिस्‍थितीबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना राजू शेट्टी म्‍हणाले, कोल्‍हापूर ही शाहू महाराज यांची पुरोगामी नगरी आहे. इथं दोन समाजात तेढ निर्माण होणं दुर्दैवी आहे. कोणीतरी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्‍ट टाकतं आणि संपूर्ण समाजाला वेठीस धरण्‍याचा प्रकार होतो, याचा विचार होणं गरजेचं आहे. कोल्‍हापुरातील तरुणांनी भावनेच्‍या आहारी जावू नये, असं आवाहनही शेट्टी यांनी केलं.

दरम्यान, कोल्हापुरातील परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. शहरातील अनेक भागात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असून तणाव निर्माण झाला आहे. कोल्हापूर महानगरपालिका चौकातील रिक्षा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी फोडली आणि उलटवली. तर, चप्पल लाईनला असलेलं हॉलिऊड शूजचं दुकान देखील फोडलं. हिंदुत्ववादी कार्यकर्ते शहरभर पसरले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

टॅग्स :KolhapurRaju Shettipolice