कोल्हापूर : तुरंबेत सापडले गुहा आणि तळघर

मंदिर जीर्णोद्धारावेळी प्रकार उघड; चौकशी करण्याची मागणी
तुरंबेत सापडले गुहा आणि तळघर
तुरंबेत सापडले गुहा आणि तळघरsakal

सरवडे : राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथे ग्रामदैवत गहिनीनाथ आणि भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असताना मंदिराशेजारी गुहा आणि दोन खोल्यांचे तळघर सापडले. भुयारी मार्गात जुन्या काळातील चौकटी, दगडी खांब आहेत. पुरातत्त्व खात्याने चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

तुरंबेजवळील टेकडीवर ग्रामदैवत गहिनीनाथ आणि भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. काल (ता. २१) खोदकाम करताना गुहा आणि दोन खोल्यांचे तळघर सापडले. जमिनीपासून खाली दहा ते बारा फूट अंतरावर तळघर असून, पुढे जाण्यासाठी मार्ग आहेत.जुन्या काळातील हे बांधकाम असून जुन्या विटा दिसून आल्या. याची पुरातत्व विभागाने चौकशी करावी आणि याचे संवर्धन करावे अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

भुयारी मार्ग खुला केल्यानंतर जुन्या काळातील अनेक वस्तू दिसून आल्या. अंधारामुळे पुढे जाणे धोक्याचे आहे. आत गेलेल्या तरूणांनी सावधगिरी बाळगत माहिती घेतली. ऑक्सिजनचे प्रमाणही कमी आहे. गुहा आणि खोल्यांची माहिती मिळताच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. उत्खनन करून चौकशी करावी अशी मागणी सरपंच मयुरी भावके यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com