
कोल्हापूर : निम्म्या शहराचे पाणी आज बंद राहणार
कोल्हापूर : जवळपास निम्म्या शहरातील पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार असून, मंगळवारीही कमी दाबाने पाणी मिळणार आहे. त्याचा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून महापालिकेने टॅंकरद्वारा पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. नागरिकांना टॅंकरची मागणी करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्यांचे मोबाईल नंबर व टॅंकर विभागाचे फोन नंबर प्रसिद्ध केले आहेत. त्याचा वापर करून टॅंकरची मागणी करता येणार आहे.
बालिंगा उपसा केंद्राकडील वीजपुरवठा महापारेषण कंपनी तांत्रिक कामकाजासाठी बंद ठेवणार आहे. त्यामुळे पाणी उपसा बंद राहणार असून, बालिंगा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागात सोमवारी (ता. ९) पाणीपुरवठा होणार नाही. तसेच मंगळवारीही कमी दाबाने तसेच काही भागात पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे.
उन्हाचा तडाखा वाढलेला असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत यासाठी पाणीपुरवठा विभागाने टॅंकर मागणीसाठी थेट शाखा अभियंत्यांचे मोबाईल नंबर दिले आहेत. याद्वारे त्या त्या भागात टॅंकर पाठवता येणार आहेत. ए, बी, सी, डी वॉर्ड तसेच संलग्न उपनगरे, ग्रामीण भागात दोन दिवस परिणाम जाणवणार आहे. सध्या नगरसेवक नसल्याने थेट अधिकाऱ्यांचे नंबर नागरिकांकडे उपलब्ध नसतात. त्यामुळे प्रशासनाने अधिकाऱ्यांचे नंबर दिले आहेत.
अधिकाऱ्यांचे नंबर
प्रिया पाटील, शाखा अभियंता,
ए, बी वॉर्ड कळंबा फिल्टर वितरणः ९९२१५१३२८२
मिलिंद पाटील, शाखा अभियंता, ए, बी वॉर्ड
पाण्याचा खजिना वितरण विभागः ९८९००८३५४५
अभिलाषा दळवी, शाखा अभियंता,
सी, डी वॉर्ड, कोकणे मठ वितरण विभागः ८५३०८७३०५७
मिलिंद जाधव, शाखा अभियंता,
राजारामपुरी वितरण विभागः ७३८७९४३३७७
राजेंद्र हुजरे, शाखा अभियंता,
कावळा नाका वितरण विभागः ७७०९०४२१७९
टॅंकर वाटपाच्या ठिकाणचे नंबर
कळंबा जलशुद्धीकरण केंद्र (प्रिया पाटील, मिलिंद पाटील, अभिलाषा दळवी) ०२३१२३२३७२८, ९५६१७१३१८१
बावडा जलशुद्धीकरण केंद्र (मिलिंद जाधव, राजेंद्र हुजरे)
०२३१२६६७७८२, ९०२८४१३५२०
Web Title: Kolhapur City Water Closed Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..