esakal | केडीसीसीचे रणांगण : पी. एन. यांचे स्थान बळकट, पण आव्हानही
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur : कोरेंच्या विरोधात कोण, हीच उत्सुकता

केडीसीसीचे रणांगण : पी. एन. यांचे स्थान बळकट, पण आव्हानही

sakal_logo
By
कुंडलिक पाटील

कुडित्रे : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विकास सोसायटी गटात सर्वाधिक मतदान असलेल्या करवीर तालुक्यात सद्यस्थितीत विद्यमान संचालक व आमदार पी. एन. पाटील यांचे स्थान बळकट असले तरी ‘गोकुळ’च्या बदललेल्या संदर्भामुळे निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही, म्हणून एखादा ‘मोहरा’ रिंगणात उतरला जाण्याची शक्यता आहे. पराभवासाठी रिंगणात उतरणार कोण, हा प्रश्‍न आहे. आतापर्यंत अपवाद वगळता श्री. पाटील तालुक्यातून बिनविरोध विजयी झाले आहेत.

श्री. पाटील यांची ५ वर्षांची अध्यक्षपदाची कारकीर्द वगळता करवीरला अध्यक्ष पदाने हुलकावणी दिली आहे. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादीत समझोता होऊन प्रत्येकी अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद दोन्ही पक्षांना असा फॉर्म्युला ठरला होता, पण अडीच वर्षांनंतर यावर चर्चाही न झाल्याने पी. एन. यांचे अध्यक्षपद हुकले. या तालुक्यात युती झाली, तर महाविकास आघाडी होईल, अन्यथा पारंपरिक काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेना आणि शेकापमध्ये लढती होतील, असे चित्र आहे. तिन्हीही पक्षांत इच्छुकांची मांदियाळी आहे. काँग्रेसमधून दोन उमेदवार असतील, तर राष्ट्रवादीतून एक, शिवसेना आणि शेकापकडून सर्व गटातून उमेदवार देण्याची तयारी आणि चाचपणी सुरू आहे.

हेही वाचा: IPL 2021 : खूशखबर; प्रेक्षकांसाठी स्टेडियमचे उघडले दरवाजे!

आमदार पाटील यांनी ३० वर्षे बँकेत संचालक म्हणून काम पाहिले आहे. तालुक्यात विकास सोसायटी, सामुदायिक शेती संस्था गट २५७ असून, जास्त काम या संस्थांच्या माध्यमातून चालते. याठिकाणी आमदार पाटील यांचे नेटवर्क आहे. पालकमंत्री सतेज पाटील गगनबावडा येथून उतरतील, यामुळे करवीरमध्ये बिनविरोध झाले, तर काँग्रेसचे सर्व नेते एकत्र राहतील. गतवेळी संस्था पातळीवर निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित जागांवर मतदान झाले. यामुळे अनेक दिग्गजांची अडचण झाली होती. यावेळी आम्ही लढणारच, या भूमिकेवर नेते तयारीला लागले आहेत.

संस्था गटातून आमदार पाटील विरुद्ध शेकापचे अशोकराव पवार-पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे. आमदार महादेवराव महाडिक यांचीही भूमिका महत्त्वाची आहे. दक्षिणमधून पालकमंत्री पाटील यांच्या गटातील कोणी इच्छुक नाही. आमदार जयंत आसगावकर पालकमंत्री पाटील यांच्या निर्णयाबरोबर राहतील. विधानसभेला पराभव झाल्यानंतर नरके गटात नाराजी होती, गोकुळनंतर नरके गटाला ऊर्जा आली आहे. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सर्व गटातून उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे.

काँग्रेसमधून आमदार पाटील, महिला गटात उदयानीदेवी साळोखे पुन्हा रिंगणात असतील, तर राष्ट्रवादीतून व्ही. बी. पाटील, अमर पाटील इच्छुक आहेत. शेकापचे अशोक पवार-पाटील, क्रांती पवार-पाटील, केरबा पाटील, बाबासाहेब देवकर यांनीही तयारी चालवली आहे.

हेही वाचा: धारावीच्या जान मोहम्मदचे 'दाऊद'शी जुने संबंध - ATS प्रमुख

दृष्टिक्षेपात करवीर तालुका...

  • विद्यमान संचालक- आमदार पी. एन. पाटील, उदयानीदेवी साळोखे

  • पात्र संस्था - १०८४

  • विकास व शेती संस्था गट - २५७

  • प्रक्रिया संस्था - ५७

  • पाणीपुरवठा व पतसंस्था - १२२

  • दूध उत्पादक गट, गृहनिर्माण मजूर संस्था - ६४८

loading image
go to top