
कोल्हापूर : प्रभाग रचनेचे गॅझेट प्रसिद्ध
कोल्हापूर: महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या बहुचर्चित अंतिम प्रभाग रचनेचे गॅझेट रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आले. दिवसभर इच्छुकांच्या नजरा गॅझेटकडे लागल्या होत्या. किरकोळ बदल वगळता महापालिकेने सादर केलेली प्रभाग रचनाच अंतिम करण्यात आली.राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महापालिकेने त्रिसदस्यीयप्रमाणे जानेवारीत प्रभागरचना पूर्ण केली होती. त्याचे प्रारूप प्रसिद्ध करून हरकती मागवल्या होत्या. विभागीय आयुक्तांनी ११५ हरकतींची सुनावणी पूर्ण करून दुरुस्तीसह अंतिम अहवाल आयोगाकडे पाठवला होता. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना होण्यापूर्वीच राज्य सरकारने नवीन कायदा केल्याने प्रक्रिया थांबली होती. ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली होती.
महापालिकेने सर्व प्रक्रिया पूर्ण करून आयोगाकडे प्रभाग रचना पाठवली होती. त्याचे गॅझेट शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. महापालिका प्रशासनाला ती प्रभाग रचना महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करावी लागणार असल्याने रात्री उशिरापर्यंत निवडणूक विभागाचे अधिकारी प्रतीक्षा करत होते. दिवसभर केव्हाही गॅझेट जाहीर होणार असल्याने इच्छुकांचेही लक्ष त्याकडे लागले होते. नेमके काय बदल झाले त्याची माहिती महापालिकेचे अधिकारी घेत होते.
प्रभाग रचना
एकूण प्रभाग ३१
एकूण सदस्य संख्या ९२
तीन सदस्य
असणारे प्रभाग ३०
२ सदस्य असणारा प्रभाग १
Web Title: Kolhapur Corporation Ward Formation Gadget
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..