कोल्हापूर : मेक्सिकोतील ‘एग फ्रूट’ कोल्हापुरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एग फ्रूट

कोल्हापूर : मेक्सिकोतील ‘एग फ्रूट’ कोल्हापुरात

कोल्हापूर : मोरेवाडी परिसरातील आर. के. नगरमध्ये ‘एग फ्रूट’ हा परदेशी वृक्ष आढळला आहे. परितोष ऊरकुडे आणि वनस्पती तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी या वृक्षाची माहिती शोधून त्याची नोंद राज्य आणि जिल्ह्याच्या वनस्पती कोषात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हा वृक्ष मूळचा मेक्सिको देशातील असून त्याची फळे उकडलेल्या अंड्यासारखी दिसतात म्हणून त्याला एग फ्रूट असे म्हटले जाते. या वृक्षाची माहिती देण्यासाठी डॉ. बाचूळकर यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे.

पत्रकातील माहितीनुसार, वृक्षप्रेमी परितोष ऊरकुडे यांना आर. के. नगर येथील शशिकला राणे यांच्या घराच्या कुंपणाबाहेर आंब्यासारखी फळे लागलेला वृक्ष नजरेस पडला. वृक्षाला फुलेही होती. त्यांनी श्रीमती राणे यांच्याकडे झाडाबद्दल चौकशी केली असता. काही वर्षांपूर्वी वृक्षाचे रोप कालिकत (केरळ) वरून आणल्याचे समजले. डॉ. बाचूळकर यांनी वनस्पतींचा संदर्भ ग्रंथ पाहिल्यानंतर त्यांना या वृक्षाची ओळख पटली. ‘एग फ्रूट’ या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वृक्षाचे शास्त्रीय नाव ‘पाऊटेरीया कॅम्पिचिएना’ असे असून हा विदेशी वृक्ष ‘सॅपोटेएसी’ म्हणजेच चिक्कूच्या कुळातील असल्याचे स्पष्ट झाले.

या वृक्षाला ‘यल्लो सॅपोटी’, ‘कपकेक फ्रूट’ व ‘कॅनिस्टेल’ अशी इतरही इंग्रजी नावे आहेत. हा वृक्ष मूळचा मध्य अमेरिकेतील मेक्सिको या देशातील आहे. ‘एग फ्रूट’चे वृक्ष सॅल्वाडोर, गौतेमाला, या देशातील जंगलात नैसर्गिकपणे वाढलेले आढळतात. फळांसाठी या वृक्षांची अनेक देशात लागवड केली आहे. एग फ्रूट हा लहान ते मध्यम आकाराचा सदाहरीत वृक्ष असून तो दहा मीटर उंचीपर्यंत वाढतो. फांद्या पसणाऱ्या तर काही खाली झुकलेल्या असतात.

Web Title: Kolhapur Egg Fruit From Mexico

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top