कोल्हापूर :महापूरप्रश्‍नी मानवी साखळीतून एल्गार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 mahapur

कोल्हापूर :महापूरप्रश्‍नी मानवी साखळीतून एल्गार

कोल्हापूर : जिल्ह्यात २०१९ व २०२१ असा दोन वेळा महापूर आला. यामुळे हजारो कोटींचे नुकसान झाले. महापुराचा कालावधी कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी उपाययोजना सुचविल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. म्हणूनच ‘सकाळ’ने पुढाकर घेऊन या प्रश्नी जनतेची भूमिका मांडण्याचे काम केले आहे. महापूरप्रश्नी आता लोकचळवळ उभारावी लागेल. यासाठी ‘सकाळ’च्या माध्यमातून पूरग्रस्त नागरिक मानवी साखळी करून प्रशासनाला या प्रश्नी जाग आणण्याचे काम करतील. येत्या ३ जूनला शहरासह जिल्ह्यात १० ठिकाणी मानवी साखळी केली जाणार आहे. यात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.

जागतिक तापमान वाढ, निसर्गाचा बदललेला समतोल यामुळे कमी कालावधीत जास्त पाऊस पडतो. त्यामुळे महापुराची स्थिती निर्माण होते. यातून हजारो कुटुंबांचे स्थलांतर करावे लागते. या स्थलांतरात जनावरांचा जीवही जातो. शेती, व्यापारी, उद्योगधंदे यांचे हजारो कोटींचे नुकसान होते. घरांची पडझड झाल्याने काही जणांना बेघरही व्हावे लागते. महापूर रोखणे हे जरी कोणाच्या हातात नसले, तरी महापुराचा कालावधी कमी करणे, महापुराच्या पाण्याची कमी कालावधीत निर्गत करणे आवश्यक आहे. यासाठी समिती नेमून त्याद्वारे उपाययोजनांची चर्चा झाली. मात्र, त्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत काही झाले नाही. पूर्वी पूर हा फक्त नदीच्या परिसरात यायचा. मात्र, शहरातील नाले,

ओढ्यांतील पाणी आसपासच्या घरात गेल्यानेही महापुराचा फटका शहरातील उपनगरातील नागरिकांना बसला आहे. यासाठी नाले व ओढ्यांतील गाळ आणि अतिक्रमणे काढणे, ओढ्यांच्या पात्राची मूळ रुंदी कायम ठेवणे असे करणे आवश्यक आहे. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे.

येथे होणार मानवी साखळी

पंचगंगा शिवाजी पूल व्हीनस कॉर्नर शाहूपुरी हळदी-सडोली पूल शिरोली पूल शिये- बावडा पूल रुई-इंगळी पूल इचलकरंजी पूल शिरोळ ते कुरंदवाड पूल

नृसिंहवाडी ते कुरुंदवाड पूल

मानवी साखळी करताना वाहतुकीचा कोणताही अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने आयोजन करायचे आहे.)

येथे संपर्क साधा

महापूर ठरावीक एकाच कारणामुळे येत नाही. महापुरासाठी विविध गोष्टी कारणीभूत आहेत. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून उपाययोजना करण्यासाठी याचा अहवाल ‘सकाळ’च्या पुढाकारातून तयार करण्यात येणार आहे. आपल्या सूचना, मते नोंदविण्यासाठी तसेच मानवी साखळीसाठी सहभाग नोंदविण्यासाठी बातमीदार गणेश शिंदे (जयसिंगपूर) ९०११०००६८५ यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Kolhapur Elgar Human Chain On Flood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top