esakal | कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्‍या सुरक्षेवर भर
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur

कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्‍या सुरक्षेवर भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाई मंदिराची पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पाहणी केली. मंदिरातील सध्याचा बंदोबस्त, सीसीटीव्ही आदीसह सुरक्षेसंबंधी सर्व गोष्टींची माहिती घेतली. उत्सव काळातील गर्दीच्या नियोजनासंबधी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या सूचनाही विचारात घेतल्या.

नवरात्रोत्सवास गुरुवारी पासून सुरवात होत आहे. कोरोनामुळे गतवर्षी नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा झाला होता. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंदिर खुले होणार आहे. अंबाबाई मंदिरात उत्सावात होणाऱ्या गर्दीचे नियोजनाची तयारी जिल्हा पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे. याचाच भाग म्हणून आज पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी मंदिराची पाहणी केली. चारही प्रवेशद्वारासह मंदिर आणि परिसराची त्यांनी पाहणी केली. मंदिरातील सीसीटीव्ही आणि परिसरातील सीसीटीव्हीची माहिती घेतली. उत्सव काळातील सोशल डिस्टन्सिंगसह निर्देशाचे पालनासह बंदोबस्ताबाबत अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यात महिलांची सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा: पंढरपूर मंदिर परिसरातील पूजेचं साहित्य विक्रेते भाविकांच्या प्रतिक्षेत!

दरम्यान, बलकवडे यांनी यापूर्वीच्या उत्सव काळात बंदोबस्तामध्ये कर्तव्य बजावलेल्या पोलिसांशी चर्चा केली. कर्तव्य बजावताना आलेल्या अडचणी आणि उपयायोजनांबाबत त्यांच्या सूचनाही जाणून घेतल्या. भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगस्थळांचीही पाहणी केली. या वेळी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, जिल्हा विशेष शाखेचे तानाजी सावंत, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे दत्तात्रय नाळे, शहर वाहतूक शाखेच्या स्नेहा गिरी आदी उपस्थित होते.

अपेक्षित बंदोबस्त

पोलिस उप-अधीक्षक १

पोलिस निरीक्षक - २

उपनिरीक्षक - ७

कर्मचारी - १५०

जलद कृतिदल - १

होमगार्ड - १२५

loading image
go to top