esakal | Kolhapur : महापुराचा रियल इस्टेटलाही फटका
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

Kolhapur : महापुराचा रियल इस्टेटलाही फटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : घर हवे, पण पुराचे पाणी येणाऱ्या भागात नको, अशी मानसिकता लोकांची झाल्याने पूरबाधित क्षेत्रात नव्या गृहनिर्माण प्रकल्पांना खो बसला आहे. बांधकाम व्यावसायिकही सध्या ‘वेट ॲन्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. ज्या भागात पाणी आले, तेथे फ्लॅटचे दर कमी करून मागितले जात आहेत.

२०१९ च्या महापुरानंतर गेल्या महिन्यात महापुराचे रौद्ररूप नजरेस पडले. खानविलकर पंप, जयंती नाला परिसर, असेंब्ली रोड, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, महावीर महाविद्यालय ते रमणमळा, कसबा बावड्याचा काही भाग, नागाळा पार्कचा काही भाग येथे मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले. २००५ च्या महापुरानंतर पार्किंग वर उचलून इमारती उभारल्या गेल्या. रेड झोनमधून सुटका करण्यासाठी पार्किंग वर उचलण्याची पळवाट शोधली. परिणामी ज्या भागात इमारती उभ्या राहायला नको, तेथे त्या उभ्या राहिल्या. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भराव टाकला गेला. यावर्षीच्या महापुरात परिसर पाण्याखाली गेल्यानंतर आता सर्वांचे डोळे उघडले आहेत. महापुरानंतर अडचणी येत आहेत.

शहराची हद्दवाढ न झाल्याने जमिनीचे क्षेत्र मर्यादित आहे. पूरग्रस्त भागात नव्याने गृहप्रकल्प होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशा स्थितीत उपनगरातील भूखंडांना सोन्याचा भाव आला आहे. ज्या भागात पुराचे पाणी आले, तेथेही नव्याने फारशी दस्त नोंदणी झाली नसल्याचे दुय्यम निबंधक कार्यालयातून दिसून येते. या भागात ज्यांनी कर्जे काढून फ्लॅट घेतले आहेत. त्यांच्यासमोर कर्ज फेडायचेच आव्हान आहे. फ्लॅट विकावा तर पुनर्विक्रीचा दर (रिसेल व्हॅल्यू) कमी झाला आहे. महापुरामुळे रहिवासी क्षेत्राचे नव्हे, तर व्यापारी वर्गाचेही आर्थिक नुकसान झाले. काही जणांनी तर व्यवसायाचे ठिकाणच बदलले आहे. दरवर्षी पाणी येणार त्यामुळे प्रत्येकवेळी नुकसान कोण सहन करणार, यापेक्षा पाणी न येणाऱ्या भागात स्थलांतरित झालेले बरे अशी मानसिकता झाली आहे.

हेही वाचा: टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या सुधारणांना मंजुरी; Vodafone-Ideaला दिलासा

ब्ल्यूलाईन, रेडझोन, एलोझोन याचे वेळीच मार्किंग झाले असते, तर पुराच्या पाण्याची तीव्रता पूर्वीच कळाली असती. महापालिका तसेच इरिगेशन विभागात समन्वय असायला हवा होता. किमान तिसऱ्या विकास आराखड्यातही तरी त्रुटी राहू नयेत, अशी अपेक्षा आहे. पुराचे पाणी शहराबाहेर पडण्याच्या व्यवस्थेवर काम व्हावे.

- विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष क्रेडाई.

loading image
go to top