कोल्हापूर : गिरोलीत मधमाश्‍या संवर्धनाचे प्रशिक्षण

मधमाश्‍यांना कोणतीही इजा न करता मध व मेण काढणे आणि संकलन करणे याचे प्रशिक्षण
Kolhapur Giroli Beekeeping training collecting honey without harming the bees
Kolhapur Giroli Beekeeping training collecting honey without harming the beessakal

जोतिबा डोंगर : पारंपरिक पद्धतीने मधमाश्‍यांची पोळी जाळून तसेच त्यावर कीटकनाशकांची फवारणी करून मधमाश्‍यांना मारून मध व पोळी काढली जायची. प्रशिक्षणच नसल्याने हे काम ज्या त्या भागातील स्थानिक शेतकरी वर्ग करीत. परंतु, गिरोली (ता. पन्हाळा) गावातील मोहन उत्तम कदम हे मात्र या मधमाश्‍यांच्या संवर्धनासाठी कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदर्ग जिल्ह्यात शास्त्रीय पद्धतीने मधमाश्‍यांना कोणतीही इजा न करता मध व मेण काढणे आणि संकलन करणे याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक देण्याचे काम करीत आहेत.

श्री. कदम यांनी दहा वर्षांपासून हे काम सुरू केले असून, आजपर्यंत त्यांनी एक हजारावर मधपोळी काढली आहेत. केंद्रीय मधमाश्‍या संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (पुणे) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय (कोल्हापूर) यांच्या सहकार्याने ही सेवा सुरू आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कोल्हापूर कृषी विभाग यांनी कदम यांना हे प्रशिक्षण दिले.

मधाची पोळी काढताना विशेष काळजी घ्यावी लागते. सुरक्षा म्हणून ड्रेसकोड घालावा लागतो. नैसर्गिक पद्धतीने धूर करून मधमाश्‍यांना दिला जातो. त्यानंतर त्या मधमाश्‍या पोळी सोडून दूर जातात. त्या काळात पोळीतील मधाचा भाग काढून घेतला जातो व पोळी तशीच ठेवली जातात. त्यामुळे मधमाश्‍या मृत होत नाहीत.

मेणाचा वापर विविध शोभेच्या वस्तू, मेणाचा पत्रा करण्यासाठी होतो. तसेच, मधाचा उपयोग खाण्याबरोबर आयुर्वेदीक औषधात केला जातो. श्री. कदम हे उच्चशिक्षित तरुण असून, त्यांनी गिरोली गावात नैसर्गिक पद्धतीने शेती केली आहे. आग्या मधमाशीचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे अनेक जण मधपोळी काढताना मधमाश्‍या मारून टाकतात. त्यामुळे त्यांचे संवर्धन होत नाही. मधमाश्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. मधमाश्‍या पर्यावरणासाठी आवश्यक आहेत.

- मोहन कदम, गिरोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com